Bangladesh : बांग्लादेशात ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट; ६ जणांचा होरपळून मृत्यू

बांग्लादेशच्या चटगावच्या सीताकुंड उपजिल्ह्याच्या कदम रसूल विभागात ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट होऊन सहा लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Bangladesh News
Bangladesh News Saam tv
Published On

बांग्लादेश : बांग्लादेशमधून मोठी बातमी हाती आली आहे. बांग्लादेशमधील चटगावच्या सीताकुंड उपजिल्ह्याच्या कदम रसूल विभागात ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशमधील चटगावच्या सीताकुंड उपजिल्ह्याच्या कदम रसूल भागातील ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या स्फोटाचा हादरा २ किलोमीटर अंतरापर्यंत बसला आहे. या हादऱ्यामुळे तेथील इमारतींचे नुकसान झाले आहे.

ऑक्सिजन प्रकल्पाच्या भीषण स्फोटात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ऑक्सिजन प्रकल्पाच्या जवळील एक किलोमीटर जवळील कदम रसूल बाजारात बसलेल्या ६५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर जड वस्तू पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. शमशुल आलम असे मृत व्यक्तीचे नाव होते.

Bangladesh News
Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागले; झटपट चेक करा इंधनाचे दर

बांग्लादेशातील (Bangladesh) या ऑक्सिजन प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटानंतर प्रकल्पातील कामगारांना तातडीने बाहेर काढण्याचे काम केले. घटना घडल्यानंतर तातडीने १२ जणांना प्रकल्पातून बाहेर काढले. या भीषण स्फोटामुळे कारखानाच्या खिडक्या तुटल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ऑक्सिजन प्रकल्पात शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. स्फोट झाल्याची खबर मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर स्फोटामुळे लागलेली आग (Fire) विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.

Bangladesh News
Gujarat Fire : केमिकल कंपनीला भीषण आग; संपूर्ण मालमत्ता जळून खाक, गुजरातमधील मोठी दुर्घटना

दरम्यान, या स्फोटातील २५ लोकांना तातडीने चटगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या वर्षी ४ जून रोजी कंटेनर डेपोला देखील भीष आग लागली होती. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या सदस्यासहित ५१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com