Bangaladeshi MP Death Case: बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्यात हत्या, महिलेला अटक; असे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Bangladesh MP Anwarul Azim AnwarSaam Tv

Bangaladeshi MP Death Case: बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्यात हत्या, महिलेला अटक; असे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात

Bangladesh MP Anwarul Azim Anwar: या हत्येचा मुख्य आरोपी अख्तर रझमान शाहीन याने हनीट्रॅपच्या मदतीने बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांना अडकवले. शाहीनने सिलांती रहमानला खासदार अन्वारुल यांची मैत्रीण बनवले. याच माध्यमातून खासदारांची हत्या करण्यात आली.

बांगलादेशचे (Bangaladesh) खासदार अन्वारुल अझीम अनार (MP Anwarul Azim Anwar) यांची कोलकातामध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कोलकात्यातील न्यूटाऊन भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अन्वारुल अझीम यांना हनीट्रॅप करण्यासाठी वापरण्यात आलेल्या महिलेला बांगलादेशमधून अटक करण्यात आली आहे.

या हत्येचा मुख्य आरोपी अख्तर रझमान शाहीन याने हनीट्रॅपच्या मदतीने बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांना अडकवले. शाहीनने सिलांती रहमानला खासदार अन्वारुल यांची मैत्रीण बनवले. सिलांतीने बांगलादेशी खासदाराला एका मॅसेजद्वारे न्यूटाऊनमधील एका फ्लॅटवर बोलावून घेतले. त्यानंतर याच ठिकाणी खासदार अन्वारुल यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

सिलांतीने मेसेजमध्ये लिहिले की, मी कोलकात्याला आली आहे. मी आता न्यूटाऊनला पोहोचले. खूपच अर्जंट आहे. लवकर या.' बांगलादेशचे खासदार अन्वारुल हे सिलांतीच्या एका कॉलवर कोलकाता येथील न्यूटाऊनमध्ये पोहोचले. खासदार सिलांतीसोबत न्यू टाऊन फ्लॅटवर गेले. 2 सुपारी किलर फैजल, मुस्तफिजूर यांना खासदार अन्वारुल यांच्या हत्येचे सुपारी देण्यात आली होती. अन्वारुल हे फ्लॅटमध्ये पोहचल्यानंतर दोघांनी त्यांची हत्या केली.

Bangaladeshi MP Death Case: बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्यात हत्या, महिलेला अटक; असे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Chhattisgarh Naxalites Encounter: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक, ८०० जवानांकडून ऑपरेशन; ८ नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात यश

अन्वारुल यांच्या हत्येसाठी ५ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. खासदाराच्या एका मित्राने सुपारी दिल्याचा संशय आहे. महिलेने खासदाराला आमिष दाखवून फ्लॅटवर नेले. ही महिला खासदाराच्या मित्राच्या जवळची असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशी खासदाराची हत्या आणि त्याचा मृतदेह बेपत्ता होण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. बांगलादेशी खासदार हत्येप्रकरणी आतापर्यंत ३ जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

Bangaladeshi MP Death Case: बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्यात हत्या, महिलेला अटक; असे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Mamata Banerjee : OBC प्रमाणपत्रावरील हायकोर्टाच्या निर्णयाने तृणमूलमध्ये अस्वस्थता; ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, पश्चिम बंगाल सीआयडीने एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने हत्येतील एका आरोपीला भेटल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमेजवळील बंगालमधील भागातील रहिवासी आहे. कोलकात्याच्या न्यूटाऊनमध्ये असलेला फ्लॅट हा बांगलादेशी खासदार अनार यांच्या मित्राचा आहे. फ्लॅटचा मालक सध्या अमेरिकेत आहे. त्याने हा फ्लॅट त्याच्या मित्राला भाड्याने दिला होता. फ्लॅटचा मालक उत्पादन शुल्क विभागात काम करतो अशी माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास सध्या कोलकाता पोलिसांकडून सुरू आहे.

Bangaladeshi MP Death Case: बांगलादेशच्या खासदाराची कोलकात्यात हत्या, महिलेला अटक; असे अडकले हनीट्रॅपच्या जाळ्यात
Azam Khan : आजम खान यांच्यासह कुटुंबीयांना मोठा दिलासा; ७ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, जामीन मंजूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com