गझवा-ए-हिंदसाठी ५० लाख हल्लेखोर तयार; शेजारील देशात शिजतोय भारतावरील हल्ल्याचा कट

Bangladesh Threatens India: बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर कट्टरतावाद्यांचं प्रस्थ वाढलंय. जमात ए इस्लामीचा डेप्युटीनं भारताविरोधात गरळ ओकत गझवा-ए-हिंद करू अशी धमकी दिलीय.
Bangladesh Threatens India:
Jamaat-e-Islami deputy in Bangladesh threatens India with Ghazwa-e-Hind, claims 50 lakh attackers ready.saam tv
Published On
Summary
  • बांगलादेशात सत्तांतरानंतर कट्टरतेचं प्रस्थ वाढलंय.

  • जमात ए इस्लामीचा डेप्युटीने भारताविरोधात गरळ ओकली.

  • गझवा-ए-हिंदसाठी ५० लाख हल्लेखोर तयार असल्याचा दावा.

बांगलादेशमध्ये सत्तांतरानंतर कट्टरतावाद्यांचं प्रस्थ प्रमाणावर वाढलंय. पाकिस्तान समर्थक कट्टरतावादी संघटना असलेल्या जमात ए इस्लामीकडून सातत्याने भारताविरोधात गरळ ओकली जातेय. जमात ए इस्लामीचा डेप्युटी असलेल्या अमीर सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहिरने भारताविरोधात गरळ ओकलीय. भारतात राबवण्यासाठी गझवा-ए-हिंदसाठी ५० लाख हल्लेखोर तयार आहेत, असा धक्कादायक दावा त्यांनी केलाय.

Bangladesh Threatens India:
NDA अन् INDIA आघाडीला जागा वाटपाचं मुहूर्त सापडेना! दावेदारीत अडकली पक्षाची रणनीती, आता नवी तारीख आली समोर

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे बांगलादेश-अमेरिकन असोशिएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अमीर सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहिरने भारताला धमकी दिली. अमीर सय्यद अब्दुल्ला मोहम्मद ताहिर जमात ए इस्लामीचा डेप्युटी आहे. गझवा-ए-हिंदसाठीच्या लढ्यात ५० लाख हल्लेखोर सहभागी होतील. ते छुप्या युद्धाच्या रणनीतीने लढतील, असा दावाही ताहीर याने केलाय.

Bangladesh Threatens India:
Leh Ladakh violence: सोनम वांगचुकचं पाकिस्तानशी कनेक्शन? शत्रू राष्ट्राला पाठवले आंदोलनाचे व्हिडिओ, तपासात धक्कादायक माहिती उघड

१९७१ च्या युद्धात जमात ए इस्लामीवर पाकिस्तानला मदत केल्याने लागलेला कलंक धुवून काढायचा आहे. , जमान ए इस्लामी सत्तेत आली तर भारतावर हल्ला होईल. मी दुवा करतो की, त्यांनी हल्ला करावा, ज्यामुळे आमच्यावर १९७१ मध्ये लागलेला कलंक धुवून निघेल, असं ताहीर या कार्यक्रमात म्हणाला.

Bangladesh Threatens India:
Leh Ladakh violence: सोनम वांगचुकचं पाकिस्तानशी कनेक्शन? शत्रू राष्ट्राला पाठवले आंदोलनाचे व्हिडिओ, तपासात धक्कादायक माहिती उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com