Bangladesh Hikes petrol Price: बांगलादेशात महागाईचा हाहाकार! पेट्रोलच्या दरात ५० टक्क्यांहून अधिक केली वाढ

बांगलादेशातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Petrol Diese Price
Petrol Diese PriceSaam Tv

नवी दिल्ली: शनिवारी बांगलादेशात पेट्रोलचे (Petrol) दर ५१.७ टक्के आणि डिझेलच्या दरात ४२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे बांगलादेशातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र इंधन दरवाढीमुळे बांगलादेश सरकारवरील अनुदानाचा बोजा कमी होईल. बांगलादेश गेल्या काही वर्षांपासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या त्यांची अर्थव्यवस्था ४१६ अब्ज डॉलरची आहे.

Petrol Diese Price
ISRO: अंतराळात भारताची नवी कामगिरी! SSLV-D1 चे यशस्वी प्रक्षेपण

महागाईचा सामना करण्यासाठी बांगलादेशने आयएमएफसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. खरे तर, जगभरात वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे बांगलादेशच्या आयात बिलात वाढ झाली आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण वाढला आहे. या दरवाढीनंतर बांगलादेशात एक लिटर पेट्रोलची किंमत आता १३० रुपये आणि डिझेल ११४ रुपये असेल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच किंमती एवढ्या वाढल्या आहेत.

'आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे इंधन (Petrol) दरवाढ करणे आवश्यक आहे. गेल्या ६ महिन्यांत सरकारी मालकीच्या तेल कंपनी बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे ८ अब्ज टक्‍के नुकसान झाले आहे, असं बांगलादेश सरकारने एका निवेदनात म्हटले आहे.

'नवीन किमती निःसंशयपणे सर्वांनाच असह्य होतील परंतु सरकारकडे पर्याय नाही. जनतेला संयम बाळगावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होताच देशातही इंधनाच्या किमती कमी होतील, असं बांगलादेशचे ऊर्जा आणि खनिज संसाधन मंत्री नसरूल अहमद म्हणाले.

Petrol Diese Price
जाळपोळीच्या घटनेनंतर मणिपूरमध्ये जातीय तणाव वाढला, ५ दिवस इंटरनेट बंद

देशातील महागाई दर गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. बांगलादेशातील चलनवाढीचा दर जुलैमध्ये ७.४८ टक्क्यांवर पोहोचला असून त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांवर झाला आहे. या कुटुंबांच्या जीवनावश्यक दैनंदिन खर्चाचा ताण वाढू लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com