ISRO: अंतराळात भारताची नवी कामगिरी! SSLV-D1 चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आपले पहिले छोटे उपग्रह SSLV-D1 प्रक्षेपित केले.
ISRO
ISROSaam Tv

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आपले पहिले छोटे उपग्रह SSLV-D1 प्रक्षेपित केले. SSLV-D1 ने 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'आझादी सॅट' आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह-02 (EOS-02) उपग्रह देखील प्रक्षेपित केला. 110 किलो वजनाचे SSLV हे तीन टप्पे असलेले रॉकेट आहे, ज्याचे सर्व भाग घन अवस्थेचे आहेत. हे केवळ 72 तासांत एकत्र केले जाऊ शकते. तर उर्वरित प्रक्षेपणाला सुमारे दोन महिने लागतात.

ISRO
जाळपोळीच्या घटनेनंतर मणिपूरमध्ये जातीय तणाव वाढला, ५ दिवस इंटरनेट बंद

मायक्रो-क्लास EOS-02 उपग्रहामध्ये प्रगत ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग आहे. हे इन्फ्रारेड बँडमध्ये कार्यरत आहे आणि उच्च अवकाशीय रिझोल्यूशनसह येत आहे, त्याचे वजन 142 किलो आहे. EOS-02 10 महिने अंतराळात कार्यरत असेल. आझादी सॅट हे आठ किलोचे क्यूबसॅट असून, त्यात सरासरी 50 ग्रॅम वजनाची 75 उपकरणे आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण भारतातील सरकारी शाळांच्या विद्यार्थिनींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने हे बनवले आहे. स्पेस किड्स इंडियाच्या विद्यार्थ्यांच्या टीमने एका प्रणालीची रचना केली जी उपग्रहाकडून डेटा प्राप्त करेल. हा उपग्रह नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो वनीकरण, कृषी, भूविज्ञान आणि जलविज्ञान यांसारख्या क्षेत्रात काम करणार आहे.

ISRO
Jagdish Dhankhar|जगदीप धनखर देशाचे नवे उपराष्ट्रपती; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

SSLV रॉकेटच्या प्रक्षेपणामुळे PSLV लहान उपग्रहांच्या भारातून मुक्त होईल कारण ते सर्व काम आता SSLV द्वारे केले जाईल. आता पीएसएलव्ही मोठ्या मोहिमेसाठी तयार होईल.

भविष्यात वाढणाऱ्या लहान सॅटेलाइट मार्केटसाठी उपयुक्त

SSLV-D1 हे वाढत्या लहान सॅटेलाइट मार्केट आणि भविष्यात प्रक्षेपण लक्षात घेऊन प्रभावी ठरणार आहे. लॉन्च झाल्यानंतर परदेशातही त्याची मागणी वाढेल. SSLV 500 किलो वजनाचा पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे, जो उपग्रहाला 500 किमी उंचीवर कक्षेत ठेवेल. त्या तुलनेत, पीएसएलव्ही सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये म्हणजेच 600 किमी वरच्या कक्षेत 1750 वजनाचा पेलोड ठेवू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com