फुगा फुटला, जीव गेला, मुलांच्या हातात फुगा बॉम्ब

A Balloon Turns Deadly: तुमच्या मुलांना खेळण्यासाठी फुगे घेऊन देताय? तर सावधान.... मुलांच्या हातातला फुगा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो... फुग्यामुळे चिमुरडीचा जीव कसा गेला?
Bulandshahr tragedy A 13-year-old girl died after a balloon burst and a rubber piece got stuck in her airway
Bulandshahr tragedy A 13-year-old girl died after a balloon burst and a rubber piece got stuck in her airwaySaam Tv
Published On

पालकांनो, सावधान.. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना रंगीबेरंगी फुगे जिवापाड आवडत असतील, आणि फुग्यांसाठी ते तुमच्याकडे हट्ट करत असतील तरीही त्यांना अजिबात फुगे देऊ नका. हवा भरलेले हे रंगीबेरंगी फुगे तुमचं आयुष्य बेरंग करु शकतात होय. आम्ही जे म्हणतोय ते 100% खरंय. कारण हवा भरलेला फुगा जीवघेणा बॉम्ब बनलाय. आणि यामुळे काय आक्रीत घडलंय.

बुलंदशहरमधील आठवीत शिकणारी 13 वर्षांची कुमकुम नावाची मुलगी गावातील दुकानातून फुगा घेऊन घरी आली. तिच्या धाकट्या भावासाठी ती फुगा फुगवत होती. त्याचवेळी अचानक फुगा फुटला आणि रबरचा तुकडा तिच्या तोंडातून श्वास नलिकेत अडकला. यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेनं देशभरात खळबळ माजलीये. कारण आपण शाळा, बागा, दुकानांमध्ये सहज मिळणारे फुगे सर्रास लहानग्यांच्या हातात देतो. मात्र हेच फुगे अचानक अशा पद्धतीनं फुगा बॉम्ब ठरु शकतात. लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा हा फुगा निष्काळजीपणे हाताळल्यावर त्यांचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे मुलं फुग्याशी खेळत असताना पालकांनी त्यांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com