Uttarakhand : बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या चकमकीत मुख्य आरोपी ठार

Baba Tarsem Singh News : तपासात ​​बिट्टूला उत्तराखंड एसटीएफ आणि हरिद्वार पोलिसांच्या हाती लागला. यावेळी भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात मोठी चकमक झाली. त्यात आरोपी अमरजीत सिंग ठार झाला.
Uttarakhand
UttarakhandSaam TV

Main Accused Killed :

उत्तराखंडमधून मोठी बातमी समोर आली आहे. नानकमत्ता गुरुद्वाराचे प्रमुख बाबा तरसेम सिंग यांच्या हत्येतील मुख्य आरोपी ठार झाला आहे. अमरजीत सिंग उर्फ ​​बिट्टू असं चकमकीत ठार झालेल्या आरोपीचं नाव आहे.

Uttarakhand
Uttarakhand Crime: उत्तराखंड दंगलीमध्ये ५० पोलीस जखमी; दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घाला, सरकारचे आदेश

28 मार्च रोजी बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधात होते. तपासात ​​बिट्टूला उत्तराखंड एसटीएफ आणि हरिद्वार पोलिसांच्या हाती लागला. यावेळी भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरात मोठी चकमक झाली. त्यात आरोपी अमरजीत सिंग ठार झाला.

अमरजीत सिंगवर याआधी 16 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बाबा तरसेम सिंग यांची गोळ्या झाडलेल्या मारेकऱ्यांपैकी त्यांचा दुसरा साथीदार फरार आहे. एसटीएफ आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बाबा तरसेम सिंग यांची हत्या झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शीख समुदायातून नाराजी आणि संताप व्यक्त केला जात होता. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली. तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Uttarakhand
Vasai Crime News : तीन वर्षांपासून फरार खुनातील आरोपी अखेर ताब्यात; प्रेयसीच्या पतीची केली होती हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com