Encounter
Encounter Saam TV

Atiq Ahmed And Ashraf Ahmed : धक्कादायक! अतिक आणि अशरफच्या हत्येमागचं मोठं कारण उघडकीस ; तिन्ही आरोपींनी स्वत:केला खुलासा

गोळ्या झाडल्यानंतर तिघांनीही सरेंडर केलं आहे. पोलिस सध्या या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.
Published on

Uttar Pradesh Prayagraj : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम अर्फ अशरफ या दोघांवर काल गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर तीन अज्ञात व्यक्तींनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर तिघांनीही सरेंडर केलं आहे. पोलिस सध्या या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत. (Crime News)

अशात या प्रकरणी आता मोठ मोठे खुलासे होताना दिसत आहेत. लवेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी हमीरपुर अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींनी या आधी देखील अनेक गुन्हे केले आहेत. हे तिघेही प्रयागराजमधील नसून आजूबाजूच्या गावात राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांचे जबान नोंदवून घेतले आहेत. यामध्ये तिघांचे स्टेटमेंट वेगवेगळे असल्याचे समजत आहे.

Encounter
Crime News : माता न तू वैरिणी! आधी केलं मद्यपान, नंतर पोटच्या मुलींसोबत केलं भयानक कृत्य, मन सुन्न करणारी घटना

प्रसिद्धिसाठी केली हत्या

गावात छोटे मोठे गुन्हे (Crime) केल्याने या तिघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता त्यांनी म्हटले आहे की, आम्ही छोटे गुन्हे करून थकलो होतो. छोट्या गुन्ह्यांनी फार प्रसिद्धि मिळवता येत नाही. त्यामुळे आम्ही काही तरी मोठं आणि वेगळं करण्याचा विचार केला. याच कारणास्तव आम्ही अतिक आणि अशरफ या दोघांची हत्या केली, असं आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे.

मात्र तिघांनीही केलेल्या या दाव्यावर सध्या विश्वास ठेवणे कठीण असल्याचे पोलिस म्हणाले आहेत. कारण तिन्ही आरोपींनी या प्रकरणावर वेगवेगळे वक्तव्य केले आहेत. हत्येची घटना घडल्यानंतर योगी सरकारमार्फत घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Encounter
Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या चिमुरड्याच Viral भाषण

अतिकचे शेवटचे शब्द...

माध्यम प्रतिनिधींनी अतिकला विचारलं की, तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं नाही, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? अतिक म्हणाला," हा आम्हाला नेलं नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की..." बस यापुढे अतीक अहमद काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अतिक अहमद याचा मुलगा असद याचंही दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याचे अंत्यसंस्कार कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. या अंत्यसंस्काराला केवळ २५ लोक उपस्थित होते, तसंच ड्रोनद्वारे यावर नजर ठेवण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com