Atal Bihari Vajpayee: 'तुम्ही तर पाकिस्तानमध्येही...' थेट नवाझ शरिफांनी केले होते कौतुक; अटल बिहारी वाजपेयींचा गाजलेला किस्सा

भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीची नोंद घेतली जाते.
atal Bihari Vajpayee
atal Bihari Vajpayee Saamtv
Published On

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: भारताचे माजी पंतप्रधान , एक आदर्श, लोकप्रिय नेते आणि प्रसिद्ध कवी म्हणून अटबिहारी वाजपेयी यांचे नाव आजही घेतले जाते. भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दिची नोंद घेतली जाते. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आज (25, डिसेंबर) अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. जाणून घेवूया त्यांच्या आयुष्यातील रंजक किस्सा जेव्हा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले होते.

atal Bihari Vajpayee
Himanshi Khurana: बिग बॉस १३ची स्पर्धक हिमांशी खुराना रुग्णालयात दाखल, -7 अंश तापमानात शूटिंग करणे पडले महागात

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान संबंध सुधरण्यासाठी दिल्ली ते लाहोर अशी बससेवाही सूरू केली. 19 फेब्रूवारी 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात ही बससेवा सुरू झाली यावेळी ते पाकिस्तान दौऱ्यावरही गेले होते.

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही यावेळी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत या पाकिस्तान दौऱ्यावर 22 सदस्य होते. ज्यामध्ये पत्रकार कुलदीप नैयर, अभिनेते देव आनंद अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.

atal Bihari Vajpayee
Aurangabad : जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; 'असा' झाला घटनेचा उलघडा

यावेळी सर्वात चर्चा झाली ती पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाची. या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे लाहोर किल्ल्यावर स्वागत करण्यात आले. यावेळच्या भाषणात त्यांनी अब जंग ना होने देंगे हम ही कविता सादर केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या या भाषणाने आणि कवितेने पाकिस्तानची जनता तर थक्क झालीच त्याचबरोबर पंतप्रधानही भारावून गेले.

अटलबिहारी वाजपेयी यांची अस्सल संस्कृत भाषा, मधुर वाणी आणि प्रभावी भाषणाने नवाझ शरिफही थक्क झाले. यावेळच्या भाषणात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे तोंडभरुन कौतुक केले. यावेळी त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचे कौतुक करताना तुम्ही आता पाकिस्तानमध्येही निवडणुक लढवून विजयी होऊ शकता अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.

atal Bihari Vajpayee
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप-आरएसएसचं योगदान काय? सामनातून जहरी टीका; तर भारत जोडो यात्रेचं कौतुक

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com