राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान काँग्रेसच्या अडचणी सुरूच, आता या तरुण नेत्याने दिला पक्षाला राजीनामा

काँग्रेसमधील नेत्यांचे राजीनामा सत्र सुरुच आहे.
congress
congress saam tv

गुवाहाटी: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' सुरू आहे, पण सध्या विविध राज्यांत आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मधून नेत्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आता आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आसाम प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस कमरूल इस्लाम चौधरी यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे.

आसाम काँग्रेसच्या नेतृत्वावर आरोप करत त्यांनी रविवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कमरूल इस्लाम यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.

congress
Funny Dance: 'काला चष्मा'वर तरुणीचा कुत्र्यासमोर भन्नाट डान्स; Video पाहून हसू आवरणार नाही

'गेल्या काही महिन्यापासून आसाम मधील काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सदस्य म्हणून राहण्याचे कोणतेही कारण राहिलेले नाही," असे त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे. कमरूल इस्लाम क्रॉस व्होट करणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने चौधरी यांनी राजीनामा पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

congress
निर्यातबंदीनंतर १० लाख टन तांदूळ बंदरात अडकला, आयातदारांनी २०% शुल्क भरण्यास दिला नकार

कमरूल इस्लाम चौधरी आसाम प्रदेश युवक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिवही होते. "आसाममधील काँग्रेस पक्षातील वातावरणामुळे मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. अनुशासनहीन नेत्यांवर कारवाई होत नसल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे मी एपीसीसीच्या सरचिटणीसपदाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पक्षात काही मोठे फेरबदल करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या नाराज नेत्यांचाही एक गट आहे. G-23 नावाच्या या गटात मुख्यतः अशा नेत्यांचा समावेश आहे जे गेल्या दशकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचा चेहरा आहेत. G-23 चे गुलाम नबी आझाद, अश्विनी कुमार, कपिल सिब्बल, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह यांनी आधीच पक्ष सोडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com