
सध्या संपूर्ण जग AI सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर लक्ष ठेवून आहे. हे एक उदयोन्मुख तंत्रज्ञान आहे आणि त्याचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. स्मार्टफोनपासून रोबोटिक्सपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये AI चा वापर केला जात आहे. एआयच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रातही अनेक प्रकारची संशोधने सुरू आहेत. यापैकी एक म्हणजे AI आधारित कृत्रिम अवयव, जे अपंगांसाठी एक वरदान ठरू शकते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एआयच्या मदतीने कृत्रिम हात बनवण्यात यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. कृत्रिम हात मेंदूद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो, म्हणजेच दिव्यांगांना प्रत्यक्ष हाताप्रमाणे कृत्रिम हात वापरता येणार आहे. यामुळे सामान्य जीवन जगणे खूप सोपे होईल.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
@power.ai अकाउंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील बनावट हाताला एआय पॉवर्ड ‘माइंड रीडिंग’ प्रोस्थेटिक आर्म असे नाव देण्यात आले आहे. पण व्हिडीओमध्ये हे काही पहिल्यांदाच समोर आलेले नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या वेगवेगळ्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिव्यांगांनाही एआयवर चालणारे कृत्रिम हात आणि पाय वापरता येतील अशी आशा आहे आणि हे स्वप्न सत्यात उतररले तर खरोखरच मोठा चमत्कार मानता येईल. मात्र, व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर अपंग मुलाने हनुवटीने बटण दाबून कृत्रिम हात सक्रिय केल्याचे दिसून येते.
जर हे माइंड कंट्रोल प्रोस्थेटिक असेल तर ते मेंदूशी कोणत्यातरी टूलद्वारे जोडले गेले असावे, परंतु व्हिडिओमध्ये असे काहीही दिसत नाही. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेले प्रोस्थेटिक हे AI नसून स्नायूंच्या हालचालीवरून हलचाल करताना दिसत आहे. त्यामुळे, व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रोस्थेटिक हे AI चे बनलेले आहे किंवा AI द्वारे कार्य करते याची पुष्टी करता येणार नाही.
एआयवर आधारित कृत्रिम अवयव बनवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. यूटा युनिव्हर्सिटी, मिनेसोटा युनिव्हर्सिटी आणि न्यूकॅसल युनिव्हर्सिटी यासारखी अमेरिकेतील आघाडीची विद्यापीठे या क्षेत्रात सातत्याने संशोधन करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.