इंजिनिअर झाला रिक्षाचालक, ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

Youth Falls In Love With Transgender: आंध्र प्रदेशमधील तरुणाचे एका ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध आहे. त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे आहे पण घरच्यांनी विरोध केला. मुलाच्या या निर्णयामुळे त्याच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली.
Andhra Pradesh News: आंध्र प्रदेश हादरले! तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Youth Falls In Love With TransgenderSAAM TV
Published On

आंध्र प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी आपले जीवन संपवलं. मुलाचे ट्रान्सजेंडरसोबतचे प्रेमसंबंध आई-वडिलांना मान्य नव्हते. या तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली. त्याने इतर आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. समाजामध्ये आपली बदनामी होईल त्यामुळे दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या नांदयालमध्ये ही घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी त्याचे आई-वडिल मुलगी शोधत होते. इंजिनिअरचे शिक्षण घेतले असून सुद्धा तो रिक्षा चालवत होता. आपल्या एकुलत्या एका मुलाचं चांगलं व्हावं यासाठी आई-वडील प्रयत्न करत होते. त्यांनी आपल्या मुलीसाठी एक मुलगी देखील पाहिली होती. पण या तरुणाने त्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेश हादरले! तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Jalgaon Crime: पोटच्या मुलीसोबत आईने उचललं टोकाचं पाऊल, घरात आढळले मृतदेह; नेमकं काय घडलं?

या तरुणाचे एका ट्रान्सजेंडरशी प्रेमसंबंध होते. गेल्या ३ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे आई-वडिलांना सांगितले होते. मुलाचे हे बोलणं ऐकून त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या मुलाला ट्रान्सजेंडरसोबत लग्न करण्यास नकार दिला. या तरुणाच्या आई-वडिलांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेश हादरले! तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Cyber Crime : कंत्राट देण्याच्या बहाण्याने रेल्वे कंत्राटदाराची ४१ लाखांत फसवणूक

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्यानंतर आई-वडिलांनी त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेले होते आणि पोलिसांना त्यांची काऊंसलिंग करण्यास सांगितले होते. ऐवढं करून ही मुलाचे मन वळवण्यात ते अपयशी ठरले. तरुणाने आई-वडिलांनी निवड केलेल्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्याने मी ट्रान्सजेंडरसोबतच लग्न करणार असल्याचे स्पष्टपणे सांगतिले.

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेश हादरले! तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Pune Crime News : आरोपीला फासावर लटकवा! राजगुरूनगरच्या संतप्त नागरिकांनी रोखला पुणे - नाशिक महामार्ग | VIDEO

त्यानंतर निराश झालेल्या आई-वडिलांनी समाजामध्ये आपली बदनामी होईल म्हणून किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणाच्या आई-वडिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरूणाच्या ट्रान्सजेंडर प्रेयसीच्या जवळच्या असणाऱ्या ट्रान्सजेंडर समूहाने त्याच्या आई-वडिलांना त्रास दिला होता.

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेश हादरले! तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत प्रेमसंबंध, आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Crime News : नवी मुंबईत १५ बांगलादेशी ताब्यात; धुळ्यातील महामार्गावर लूटमारीचा उलगडा, चोरट्याला ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com