Accident: बर्थडे पार्टीचा आनंद दु:खात बदलला, बसची रिक्षाला जोरदार धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Andhra Pradesh Accident: आंध्र प्रदेशमध्ये बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
Accident: बर्थडे पार्टीचा आनंद दु:खात बदलला, बसची रिक्षाला जोरदार धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू
Andhra Pradesh AccidentSaam Tv
Published On
  • आंध्र प्रदेशमध्ये बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात

  • अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू

  • बर्थडे पार्टी करून घरी परतताना घडली घटना

  • चिलकलुरिपेट चौकात हा भीषण अपघात झाला

आंध्र प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघाताची घटना घडली. तिरुपतीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात आंध्र प्रदेशच्या पालनाडू जिल्ह्यातील चिलकलुरिपेट चौकात गुरूवारी पहाटे झाला.

चिलकलुरिपेट नॅशनल हायवेवर एका खासगी ट्रॅव्हल बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक झाली. चिलाकलुरिपेट येथील वेलुरू गावातील ७ जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले बर्थडे पार्टीत सहभागी होण्यासाठी कोंडामंजुलुरू येथे गेले होते. हा कार्यक्रम आटपून ते रिक्षाने परत वेलुरू गावाकडे येत होते त्यावेळी ही अपघाताची भयंकर घटना घडली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. ऑटो-रिक्षातून प्रवास करणाऱ्या अंदाजे १५ जणांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश आहे. मृत व्यक्ती चिलकलुरिपेट विभागातील वेलुरु गावचे रहिवासी होते. पोलिसांनी रिक्षातून मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, बापटला जिल्ह्यातील कोंडामंजुलूर येथे एका वाढदिवसाच्या पार्टीतून परत येत असताना ऑटोरिक्षातील प्रवाशांसोबत हा अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू असून अपघाताचे कारण शोधले जात आहे. जखमींवर गुंटूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून या अपघातामध्ये बोंटा बाबू (६२ वर्षे), बोंटा मनेम्मा (५५ वर्षे), संपूर्णम्मा (७० वर्षे), लक्ष्मम्मा (७५ वर्षे), गंगम्मा (५० वर्षे), चौतुपल्ली सुवार्थ (४५ वर्षे) आणि मरिअम्मा (४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com