पुन्हा महागाईची झळ! अमूल दुधाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ

देशात कोरोनाचे संकट असताना, सामन्य नागरिकाना परत महागाईची झळ सोसावी लागणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे, त्याचे परिणाम इतर वस्तूंवर दिसू लागले आहे.
पुन्हा महागाईची झळ! अमूल दुधाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ
पुन्हा महागाईची झळ! अमूल दुधाच्या किंमतीत २ रुपयांची वाढSaam Tv
Published On

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे Corona संकट असताना, सामन्य नागरिकाना परत महागाईची झळ सोसावी लागणार आहे. पेट्रोल Petrol व डिझेलच्या diesel किंमती वाढल्यामुळे, त्याचे परिणाम इतर वस्तूंवर दिसू लागले आहे. आता १ जुलैपासून अमूल Amul दूध प्रति २ रुपये लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशामध्ये नव्याने किंमतीत दूध milk उपलब्ध होणार आहे. Amul milk price hiked by Rs 2

याबरोबर अमूलच्या सर्व प्रोडक्टवर २ रुपयांची वाढ होणार आहे. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी- स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम या प्रोडक्ट Product मध्ये समावेश आहे. दीड वर्षा नंतर अमूलने आपले भाव वाढवले आहे. नवे भाव Rate लागू झाल्यामुळे अमूल गोल्ड हा आता ५८ रुपयांना मिळणार आहे. यामुळे दिल्ली Delhi, एनसीआर, गुजरात Gujarat, महाराष्ट्र, आणि पश्चिम बंगाल सारख्या अन्य राज्यांना दूध महाग मिळणार आहे.

हे देखील पहा-

अमूल दुधाच्या किंमती मध्ये उद्यापासून २ रुपयांनी नव्यांने वाढ होणार आहे. नव्या किंमती मध्ये अमूल गोल्ड, ताजा, शक्ती, टी स्पेशलसहीत गाय व म्हैशीच्या दुधावर लागू होणार आहेत. जनावरांचे खाद्य महागले आहे. Amul milk price hiked by Rs 2

पुन्हा महागाईची झळ! अमूल दुधाच्या किंमतीत २ रुपयांची वाढ
गुळाच्या दरात मोठी वाढ.... 

याबरोबरच पॅकिंगची packing किंमत ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. परिवहन आणि वीज यांच्या किंमतीही ३० टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दुधाच्या किंमती वाढलयामुळें आता दुसऱ्या डेअरी प्रोडक्टच्या किंमती मध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये पनीर, तूप, ताक, लस्सी, आइसक्रिम Ice cream यांच्या किंमती मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com