

ओक्लाहोमा: अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 8 दिवसांपूर्वी अमेरिकेच्या टेक्सास शहरात गोळीबाराची (Shooting) घटना समोर आली होती. यामध्ये 19 विद्यार्थ्यांसह तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची घटना बुधवारी घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा (Oklahoma) शहरात एकाने गोळीबार सुरू केला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत (America Oklahoma Shooting Marathi News)
हॉस्पिटलमध्ये घुसून गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, एका संशयिताने आपल्या पिस्तूलसह वैद्यकीय कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला आणि अचानक गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचाही जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
मृतांच्या संख्येला दुजोरा देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराचाही मृत्यू झाला. मात्र हा हल्ला का झाला आणि हल्लेखोर कसा मारला गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांनी इमारत सील केली असून शोधमोहीम सुरू आहे. हल्ल्यानंतर, सेंट फ्रान्सिस आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय इमारत संकुल पूर्णपणे बंद केले.
8 दिवसांत गोळीबाराची दुसरी घटना
अमेरिकेत सातत्याने होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांनी येथील सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आठ दिवसांपूर्वी, टेक्सासमधील उवाल्डे येथे एका 18 वर्षीय मुलाने शाळेत गोळीबार केला होता. या अपघातात 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 शिक्षकांचाही सहभाग होता. यापूर्वी मे महिन्यात बफेलोच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये एका गोर्या माणसाने 10 कृष्णवर्णीयांची हत्या केली होती.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.