Ambala News : हॉटेलात रूम बुक करून भारतीय जवानाचे भयावह कृत्य, घटनेने पोलिसही हादरले

लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा...
Ambala News
Ambala NewsSaam TV

Latest Ambala News : लष्करात तैनात असलेले नाईक अनिश कुमार सिंह यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हा लष्करी वीर केरळचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीपासून ते या हॉटेलमध्ये थांबले होते.

Ambala News
Chandrapur Crime News : चंद्रपूरात युवकाला CAR ने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद; दाेघे अटकेत

हॉटेल मालकाने दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने अनुचित प्रकार घडल्याचा संशय निर्माण झाला, त्यावरून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. लष्कर आणि पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा त्यांचा मृतदेह बाथरूमच्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.

केरळ, अंबाला येथील रहिवासी असलेले अनिश कुमार सिंग सैन्यात नायक म्हणून तैनात होते आणि सुट्टीसाठी आपल्या घरी गेले होते. 1 फेब्रुवारी रोजी ते अंबाला कॅन्टोन्मेंट लालकुर्ती येथील हॉटेलमध्ये थांबले, त्यांनी हॉटेलवाल्यांना आपली खोली दोन दिवसांसाठी बुक करण्यास सांगितले.

Ambala News
Chhatrapati Shivaji Maharaj : कॅलिफोर्नियातील उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला; पुण्याशी खास कनेक्शन

परंतु तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह हॉटेलच्या बाथरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मंगळवारी सकाळी त्यांच्या सांगण्यानुसार अनिश कुमार सिंग यांना खोली रिकामी करायची होती.

मात्र ते खाली न आल्याने हॉटेल मालकाने वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा ठोठावल्यानंतर आतून कोणताही आवाज न आल्याने अनुचित प्रकार घडल्याचा संशय निर्माण झाला, आतून आवाज येत नसल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले, त्यावरून संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com