Amarnath Yatra suspended due to bad weather
Amarnath Yatra suspended due to bad weatherSAAM TV

Amarnath Yatra: मुसळधार पावसाचा फटका, अमरनाथ यात्रा थांबवली; कॅम्पमध्ये ३००० भाविक

मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळं अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
Published on

पहलगाम: मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळं मंगळवारी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा यात्रा सुरू करण्यात येणार आहे.

Amarnath Yatra suspended due to bad weather
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा डाव उधळला, 'लश्कर'चे २ दहशतवादी अटकेत, स्फोटकांचा मोठा साठा जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम मार्गावर मुसळधार पावसामुळं अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra suspended) तूर्त थांबवण्यात आली आहे. जवळपास ३००० भाविकांना पहलगामच्या नुनवान बेस कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच्या वृत्तानुसार, कडेकोट बंदोबस्तात सहा हजारांहून अधिक तीर्थयात्रेकरूंचा सहावा जत्था दक्षिण काश्मीरमध्ये ३८८० मीटर उंचावरील पवित्र अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी मंगळवारी रवाना झाला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती.

Amarnath Yatra suspended due to bad weather
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्तात २३९ वाहनांमध्ये एकूण ६३५१ यात्रेकरू येथील भगवती नगर यात्रेकरून (pilgrims) निवास येथून रवाना झाले आहेत. बालटाल आधार शिबिरासाठी जाणाऱ्या २ हजारांहून अधिक यात्रेकरू ८८ वाहनांमधून पहाटे साडेतीननंतर रवाना झाले आहेत. त्यानंतर काश्मीरमधील पहलगाम शिबिरासाठी ४३२३ यात्रेकरू १५१ वाहनांतून रवाना झाले.

अमरनाथ यात्रा ४३ दिवस

बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी ४३ दिवसांची ही यात्रा दक्षिण काश्मीरच्या (Kashmir) पहलगाममध्ये जुन्या ४८ किलोमीटरच्या नुनवान मार्ग आणि मध्य काश्मीरच्या गांदरबलमध्ये १४ किलोमीटरच्या बालटाल मार्गापासून ३० जूनपासून सुरू होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत ७२ हजारांहून अधिक यात्रेकरूंनी या पवित्र गुहेतील शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा ११ ऑगस्टपर्यंत असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com