गोव्यामध्ये खात्यांचे वाटप, मुख्यमंत्री सावंतांकडे गृह, वित्त; राणेंवरही मोठी जबाबदारी

28 मार्च रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत शपथ घेतलेल्या भाजपच्या आठ आमदारांना खातेवाटपाची अधिसूचना रविवारी जारी करण्यात आली.
Pramod Sawant
Pramod SawantSaam TV
Published On

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आपला मुख्यमंत्री म्हणून दुसरी टर्म सुरु केली आहे. आज त्यांनी मंत्री पदाचे वाटप केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे गृह, वित्त, कार्मिक, दक्षता आणि राजभाषा विभाग कायम ठेवण्यात आले आहेत. रोहन खुंटे यांच्याकडे पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान आणि मुद्रण व लेखन साहित्य विभाग देण्यात आला आहे. 28 मार्च रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत शपथ घेतलेल्या भाजपच्या आठ आमदारांना खातेवाटपाची अधिसूचना रविवारी जारी करण्यात आली.

दुसरीकडे विश्वजित राणे यांच्याकडे महत्त्वाचे असे आरोग्य आणि नगरविकास, महिला व बाल व वन विभागासह नगर व ग्रामनियोजन ही खाती देण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचा पणजी मतदारसंघातून पराभव करणारे पणजीचे आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना महसूल, कामगार आणि कचरा व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे.

Pramod Sawant
''राज ठाकरे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे, त्यांनी करावं आत्मपरिक्षण''

नीलेश काब्राल यांना सार्वजनिक बांधकाम खाते

अधिसूचनेनुसार, ज्येष्ठ आमदार मौविन गोडिन्हो यांना वाहतूक, उद्योग, पंचायत आणि प्रोटोकॉल मंत्रालय, तर रवी नाईक यांना कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात आले आहे. नीलेश काब्राल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. ते विधिमंडळ कामकाज, पर्यावरण, कायदा आणि न्यायव्यवस्था ही खाती सांभाळणार आहेत.

सुभाष शिरोडकर यांना जलसंपदा, सहकार आणि प्रोवेडोरिया (सार्वजनिक सहाय्य संस्था) विभाग देण्यात आला आहे. तर गोविंद गौडे क्रीडा, कला, संस्कृती आणि आरडीए या खात्यांची जबाबदारी सांभाळतील. राणे, गोडिन्हो, कॅब्राल आणि गौडे हे 2019-22 पासून सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा भाग होते, तर खुंटे पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते आणि 2019 मध्ये त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.

मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळात आणखी तीन मंत्र्यांचा समावेश करू शकतात. गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या तीन रिक्त जागांवर एक-दोन महिन्यांत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकल्या, 40 सदस्यांच्या सभागृहात बहुमतापेक्षा एक कमी. तीन अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com