High Court News : पतीने लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कुणाकडे व्यक्त करायची? हायकोर्टाचा सवाल

High Court on Husband Wife Relation Case : जर एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंध ठेवायची इच्छा झाल्यास तर तो पत्नीला नाही तर कुणाला बोलून दाखवेल, असा सवाल इलाहाबाद हायकोर्टाने उपस्थित केला.
पतीने लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कुणाकडे व्यक्त करायची? हायकोर्टाचा सवाल
High CourtSaam Tv
Published On

High Court on Husband Wife Case : एखाद्या व्यक्तीला लैंगिक संबंध ठेवायचे असल्यास त्याने आपली इच्छा पत्नीकडे नाही तर मग कुणाकडे व्यक्त करायची? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. फक्त साक्षीदाराच्या जबाबातून हुंड्यासाठी लैंगिक छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन केले जात नाही, असं म्हणत कोर्टाने महिलेचे याचिका देखील फेटाळून लावली. इलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती कुमार गुप्ता यांनी हा निर्वाळा दिला.

पतीने लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कुणाकडे व्यक्त करायची? हायकोर्टाचा सवाल
High Court Verdict : लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नव्हे: हायकोर्ट

नेमकं काय आहे प्रकरण?

नोएडा येथील एका महिलेचे २०१५ साली लग्न झाले होते. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर सदरील महिला आपल्या माहेरी निघून आली. हुंड्यासाठी पती आपला शारीरिक आणि मानसिक छळ करतो. अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो. नकार दिल्यास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देतो, असा आरोप महिलेने केला.

याविरोधात तिने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती कुमार गुप्ता यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. कोर्टाने शांतपणे युक्तीवाद ऐकून आपला निकाल दिला. न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले "जर एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंध ठेवायची इच्छा झाल्यास तर तो पत्नीला नाही तर कुणाला बोलून दाखवेल".

"सुसंस्कृत समाजात पुरुष आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुठे जातील? प्रथमदर्शनी पत्नीने पतीची लैंगिक इच्छा पूर्ण करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचं दिसून येतंय. लैंगिक संबंध ठेवताना पत्नीला कधीच दुखापत झाली नाही. त्यामुळे याला भारतीय न्याय संहितेच्या (IPC) कलम 498A नुसार हा क्रूरता मानता येणार नाही".

फक्त हुंड्यासाठी कुणी आपल्या पत्नीचा लैंगिक छळ करू शकत नाही. केवळ साक्षीदाराच्या जबाबातून हुंड्यासाठी लैंगिक छळ केल्याच्या दाव्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे महिलेने केलेल्या आरोपात काही तथ्थ नाही, असं म्हणत न्यायमूर्ती कुमार गुप्ता यांनी तक्रारदार महिलेचे आरोप फेटाळून लावले.

पतीने लैंगिक इच्छा पत्नीकडे नाही तर कुणाकडे व्यक्त करायची? हायकोर्टाचा सवाल
High Court : बायकोच्या अनैतिक संबंधांमुळं नवऱ्यानं आत्महत्या केल्यास ती दोषी नाही: हायकोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com