

भारतात लवकरच हवेत उडणारी टॅक्सी सेवा सुरू होणार
ही एअर टॅक्सी अवघ्या ८ मिनिटांत ३६ किमी अंतर पार करते
आयआयटी मद्रास आणि ईप्लेन कंपनीने स्वदेशी तंत्रज्ञानातून तिची निर्मिती केली
या एअर टॅक्सीचे अंदाजे भाडे १७०० रुपये असण्याची शक्यता
हवेत उडणारी टॅक्सी तुम्ही कधी पाहिलीत का? याचे उत्तर कदाचित नाही असेल. पण आता तुम्हाला हवेत उडणाऱ्या टॅक्सीतून प्रवास करायला मिळणार आहे. कारण भारतात लवकरच हवेत उडणारी टॅक्सी म्हणजे एअर टॅक्सी सुविधा सुरू होणर आहे. या एअर टॅक्सीचे वैशिष्ट्य म्हणजे ती अवघ्या ८ मिनिटांमध्ये ३६ किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करते. ही एअर टॅक्सी सुविधा सुरू झाल्यानंतर प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटमध्ये जगाने अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या. या समिटमध्ये एआय-चालित एअर टॅक्सीचे मॉडेल दाखवण्यात आले. या एअर टॅक्सीची जोरदार चर्चा सुरू आहे. भविष्यात भारताला लवकरच एअर टॅक्सीची सुविधा मिळू शकते. भारतामध्ये लवकरच ही सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही एअर ट्रक्सी स्वदेशी तंत्रज्ञान आणि लोकांनीच विकसित केली आहे. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने ईप्लेन नावाच्या कंपनीने या एअर टॅक्सीची निर्मिती केली आहे.
ईप्लेन कंपनीचे असे म्हणणे आहे की, जास्त वाहतूक कोंडी होत असलेल्या शहरांमध्ये या एअर टॅक्सीच्या वापराचा फायदा होईल. महत्वाचे म्हणजे या एअर टॅक्सीसाठी कोणत्याही प्रकारच्या धावपट्टीची आवश्यकता भासणार नाही. ही टॅक्सी ८ मिनिटांत ३६ किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करू शकते. या एअर टॅक्सीचे भाडे थोडे जास्त असेल. जर एखाद्या व्यक्तीला बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून यूबी सिटीला जायचे असेल तर दोन तास लागतात. जर कोणी रस्त्याने गेला तर टॅक्सीचे भाडे १००० रुपये आहे. परंतू या एअर टॅक्सीमुळे हा प्रवास फक्त ८ मिनिटांत पूर्ण होईल. यासाठी तुम्हला १७०० रुपये भाडे द्यावे लागेल.
या एअर टॅक्सीचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा चार्ज केल्यानंतर अनेक ट्रिप करू शकते. कंपनीने या एअर टॅक्सीचे नाव e-VTOL ठेवले आहे. ज्याचा अर्थ आहे- इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग. जेव्हा विमाने आणि हेलिकॉप्टर उड्डाण करतात तेव्हा खूप आवाज येतो पण ही एअर टॅक्सीतून आवाज येणार नाही. त्याचा आवाज १२० डेसिबलपेक्षा कमी असेल. खाली रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना देखील हे कळणार नाही की एअर टॅक्सी वर उडत आहे. त्याचे उड्डाण खूप सोपे असेल आणि त्याच्या लँडिंगमध्येही कोणतीही अडचण येणार नाही.
ईप्लेन कंपनीचे संस्थापक विकल्प मित्तल यांनी सांगितले की, ही एअर टॅक्सी बॅटरीने चालेल. यामुळे त्याचा वाहतूक खर्चही कमी होईल. हेलिकॉप्टर चालवणे खूप महाग आहे कारण त्यासाठी खूप इंधन लागते. ही एअर टॅक्सी पूर्णपणे आयआयटी मद्रास येथे भारतात तयार करण्यात आली आहे. चिप्स आणि मोटर्स सारखे आवश्यक घटक भारतात डिझाइन केले गेले आहेत. फक्त त्यांचे उत्पादन बाहेर केले गेले आहे. या एअर टॅक्सीच्या डिझाइनसाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मान्यता घेण्यात आली होती आणि त्यानंतरच ते तयार करण्यासाठी प्रयत्न केले गेले. जेव्हा पहिले उत्पादन मॉडेल तयार होईल तेव्हा त्याची चाचणी केली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.