Ashutosh Dixit: 3300 तास लढाऊ विमान उडवणारे 'आशुतोष दीक्षित' भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख

3300 तास लढाऊ विमान उडवणारे 'आशुतोष दीक्षित' भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख
Ashutosh Dixit
Ashutosh DixitSaam Tv

Who Is Ashutosh Dixit : भारतीय हवाई दलाने (IAF) एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नवीन उपप्रमुख एअर मार्शल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल एपी सिंह यांच्या जागी आता आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला आहे. एअर मार्शल एपी सिंह जानेवारीपासून डेप्युटी चीफ एअर मार्शल पदावर होते.

Ashutosh Dixit
CCTV Video: कुत्रा मागे लागला म्हणून जीव मुठीत घेऊन पळाला अन् कारनं उडवलं! घटना सीसीटीव्हीत कैद

उपप्रमुख एअर मार्शल म्हणून पदभार स्वीकारलेले आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशुतोष दीक्षित यांना 20 हून अधिक विमान चालवण्याचा अनुभव आहे. (Latest Marathi News)

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांना मिग 21, मिग 29, मिराज 2000 यासह 20 हून अधिक विविध प्रकारची विमाने उडवण्याचा अनुभव आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते माजी विद्यार्थी असून 6 डिसेंबर 1986 रोजी त्यांची नियुक्ती फायटर स्ट्रीममध्ये करण्यात आली होती. 23 वर्षांच्या सेवा कालावधीत 3300 तास उड्डाण त्यांनी केली आहे.

Ashutosh Dixit
Lok Sabha Election 2024: कर्नाटक निवडणुकीनंतर वारे फिरले! काँग्रेसला लोकसभेच्या 200 जागांवर पाठिंबा देण्यास ममता बॅनर्जी तयार

आशुतोष दीक्षित हे एक कुशल वैमानिक आणि आयएफएसचे F1 फ्लाइंग ट्रेनर आणि प्रायोगिक टेस्ट पायलट आहेत. आशुतोष दीक्षित यांनी नवीन मिराज-2000 स्क्वॉड्रनचे सीईओ असण्याव्यतिरिक्त फ्लाइट टेस्ट स्क्वॉड्रनच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये स्टाफ कोर्स पूर्ण केलेल्या आशुतोष दीक्षित यांनी डिसेंबर 2023 मध्ये मिराज 2000 फायटर प्लेनसह फायटर प्लेन स्क्वाड्रनची जबाबदारी स्वीकारली. आशुतोष दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली फायटर प्लेन स्क्वॉड्रनची री इक्विपमेंट सोपी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com