

भारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वामीनाथन हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. स्वामीनाथन यांच्यावर दीर्घकाळापासून उपचार सुरू होते. स्वामीनाथन यांच्या मागे तीन मुली आहेत.
स्वामीनाथन यांनी देशात धान पिकाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी धानाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करण्यात मोठे योगदान दिले. या उपक्रमामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली. (Latest Marathi News)
स्वामीनाथन यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रमुख पदे भूषवली. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक (1961-1972), ICR चे महासंचालक आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (1972-79), कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव (1979-80) म्हणून त्यांनी काम पाहिले. (Mumbai News)
स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांच्यामुळेच भारतातील गव्हाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. स्वामिनाथन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पद्मश्री (1967), पद्मभूषण (1972), पद्मविभूषण (1989), मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि जागतिक अन्न पुरस्कार (1987) यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.