Afghanistan : अफगाणिस्तान हादरलं; शाळेत भीषण स्फोट, १० मुलांसहित १६ जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील एका शाळेत बुधवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Afghanistan
AfghanistanANI
Published On

Afghanistan News : अफगाणिस्तानात स्फोट झाल्याचं मोठं वृत्त हाती आलं आहे. अफगाणिस्तानमधील एका शाळेत बुधवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण स्फोटामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २४ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात स्फोट झाल्याचं वृत्त स्थानिक वृत्त वाहिनीने दिलं आहे. (Latest Marathi News)

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) मदरशात बुधवारी नमाज अदा करताना भीषण स्फोट झाल्याची मोठी घटना घडली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानातील ऐबक शहरात झालेल्या भीषण स्फोटात २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तातील गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी ताकोर यांनी भीषण स्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल नफी ताकोर म्हणाले, 'मदरशातील भीषण स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत'

सोशल मीडियातून समोर आलेल्या फोटोंमध्ये एका खोलीत मृतदेह आढळून आले आहेत. स्थानिक माध्यमांचं म्हणणं आहे की, 'तालीबानच्या अधिकाऱ्यांकडून स्फोट झालेल्या ठिकाणाचा व्हिडिओ काढण्यास रोखण्यात आलं आहे'. तसेच या ठिकाणी सामान्य अफगाणिस्तानी नागरिकांना जाण्यास देखील बंदी आहे. या स्फोटाची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतली नाही.

Afghanistan
उत्तरप्रदेशात मोठी दुर्घटना! फर्निचर दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील ६ जणांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, अफगाणिस्तानात आयएसआयएस दहशतवादी संघटेने नेहमी मशिद आणि नमाज अदा करताना स्फोट केले आहेत. त्यांच्याकडून नेहमीच अफगाणिस्तानातील शिया समुदायातील लोकांना लक्ष्य केलं जातं. ऑगस्टमध्ये देखील काबूलमध्ये एका मशिदीत झालेल्या स्फोटात २१ लोक मारले गेले होते.

दहशतवादी संघटनेकडून शाळेवरच बॉम्ब स्फोट केले जात आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील काबूलमध्येही स्फोट झाला. त्या भीषण स्फोटात ५२ लोकांचा मृत्यू झाला होता. मृत्यूमध्ये तरुणींचा सामावेश अधिक होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com