लवकर मायदेशी परत या, अफगाणिस्तान मधील भारतीयांना मोदींच्या सूचना

अफगाणिस्तान मध्ये राहत असणाऱ्या भारतीय नागरिकांनी तातडीने भारतात परत यावे, अशी सूचना भारत सरकारच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे.
लवकर मायदेशी परत या, अफगाणिस्तान मधील भारतीयांना मोदींच्या सूचना
लवकर मायदेशी परत या, अफगाणिस्तान मधील भारतीयांना मोदींच्या सूचनाSaam Tv
Published On

नवी दिल्ली : अफगाणिस्तान Afghanistan मध्ये राहत असणाऱ्या भारतीय Indian नागरिकांनी तातडीने भारतात परत यावे, अशी सूचना भारत सरकारच्या government वतीने यावेळी करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार वाढल्याने अनेक भागात वाहतूक Transportation विस्कळीत झाली आहे. काही भागात हिंसाचार वाढतच चालल्याने तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तान मधून भारतात जाणारी विमाने Planes जोपर्यंत सुरू आहेत.

हे देखील पहा-

तोपर्यंत मिळेल त्या विमानाने नागरिकांनी भारतात यावे, असे आवाहन अफगाणिस्तान मधील भारतीय नागरिकांना केले आहे. सध्या अफगाणिस्तान मध्ये असलेल्या भारतीयांनी आपली नावे भारत सरकारच्या अफगाणी नागरिकांच्या वेबसाईटवर website नोंदवावीत, या प्रकारची सूचना देखील यावेळी करण्यात आली आहे. विशेषतः अफगाणिस्तानात मझर- ए- शरीफ हे शहर ताब्यात घेण्याकरिता तालिबानकडून हल्ल्याची योजना आखली आहे.

तिथल्या नागरिकांना तातडीने भारतात परतण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहेत. मझर- ए- शरीफहून दिल्लीला Delhi जाण्याकरिता एका खास विमानाची भारत देशातर्फे सोय करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री त्याठिकाणी हे विमान रवाना होणार आहे.अमेरिकेने America अफगाणिस्ताना मधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यावर तालिबाननं एकेक प्रदेश काबीज करायला सुरुवात केली आहे.

लवकर मायदेशी परत या, अफगाणिस्तान मधील भारतीयांना मोदींच्या सूचना
Indian Air : फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी मिळणार?

अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यामध्ये कायम जोरदार चकमक होत आहेत. त्याठिकाणी हिंसाचार वाढला आहे. अफगाणी सरकारच्या ताब्यात असणारा एकेक भूभाग जिंकून घेण्याकरिता तालिबान आक्रमक झाला आहे. या परिस्थितीमुळे अफगाणिस्तान मध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यांच्या परतीसाठी भारत दशकडून सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com