Indian Air : फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी मिळणार?

अफगाणिस्तान तालिबानची आक्रमण हे कायम असून त्यांनी तिथल्या ६ प्रांतांवर आतापर्यंत ताबा मिळवला आहे.
Indian Air : फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी मिळणार?
Indian Air : फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी मिळणार?Saam Tv
Published On

काबूल : अफगाणिस्तान तालिबानची Taliban आक्रमण हे कायम असून त्यांनी तिथल्या ६ प्रांतांवर आतापर्यंत ताबा मिळवला आहे. यामुळे हजारो नागरिक घर सोडून पळून जात आहेत. या कठीण परिस्थिती मध्ये अश्रफ घानी यांच्या सरकारने government भारतीय Indian हवाई दलाकडे यावेळी मदत मागितली आहे. इंडियन एअर फोर्सने Indian Air Force मदतीसाठी धावून यावे, अशी अफगाणिस्तान सरकारची इच्छा आहे.

द प्रिंट ने सांगितलेल्या वृत्तानुसार इंडियन एअर फोर्सने अफगाण एअर फोर्सची मदत करण्यात यावी, अशी त्याठिकाणी असलेल्या सरकारची इच्छा आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकन American सैन्य पूर्णपणे अफगाणिस्तान मधून निघून जाईल. यानंतर तालिबानकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात येत आहे. ही चिंता त्याठिकाणी असलेल्या सरकारला आहे. गेल्या २ दिवसात अफगाण सैन्य आणि तालिबान मधील संघर्ष खूपच तीव्र झाला आहे.

हे देखील पहा-

तालिबानची नजर आता मझर- ए- शरीफवर राहणार आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील हे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर तालिबानच्या ताब्यात गेले, तर सरकार कोसळल्याचे हे संकेत राहणार आहेत. मझर- ए- शरीफ तालिबान विरोधी या शहराची ओळख आहे. कंदहार Kandahar आणि हेलमांड Helmand मध्ये अफगाण सैन्याचा कट्टरपंथीय इस्लामिक Islamic संघटनांशी हे संघर्ष सुरु झाले आहे.

Indian Air : फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी मिळणार?
तालिबान आणि अन्य दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये मुक्तपणे संचार

महिनाअखेरपर्यंत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून पूर्णपणे माघारी फिरणार आहे. अमेरिकेचे विशेष दूत झालमे खालिलझाद आता कतार Katar मध्ये आहेत. तालिबानने शस्त्रसंधी मान्य करावी, जेणेकरुन हा हिंसाचार थांबणार आहे, यासाठी हे प्रयत्न करत आहेत. अलीकडे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद हनीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली आहे.

त्यावेळेस IAF च्या मदती बद्दल चर्चा झालेली आहे. सध्या अमेरिकन एअर फोर्सने तालिबानच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. यामध्ये अनेक तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. भारत सरकार अमेरिके प्रमाणे इंडियन एअर फोर्सला अफगाणिस्तानात एअरस्ट्राइकची परवानगी देणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com