तालिबानच्या दहशतीला न जुमानता अफगाणी नागरिकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

१९ ऑगस्टला अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. यानिमित्ताने देशातील नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर आले आणि स्वातंत्र्यदिन साजरा करत तालिबान विरोधात घोषणा दिल्या.
तालिबानच्या दहशतीला न जुमानता अफगाणी नागरिकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन
तालिबानच्या दहशतीला न जुमानता अफगाणी नागरिकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिनSaam Tv News
Published On

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हा सर्वसामान्य जनता भयभित झाली आहे. असं असलं तरी काही अफगाणी महिला आणि पुरुष तालिबानच्या दहशतीला न जुमानता तालिबानचा विरोध करतायत. काल १९ ऑगस्टला अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन होता. यानिमित्ताने देशातील नागरिक मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर आले आणि स्वातंत्र्यदिन साजरा करत तालिबान विरोधात घोषणा दिल्या. (Afghan Citizens Celebrate Independence Day Despite Taliban Terrorism)

हे देखील पहा -

अफगाणिस्तान देश १९ ऑगस्ट १९१९ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य झाला होता. त्यानंतर या देशाने अनेक संघर्ष पाहिलेत. तालिबानने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापुर्वीच अफगाणिस्तानवर कब्जा केला. मात्र आता तालिबानला अफगाणी जनतेकडून मोठा विरोध होत आहे. लोकं रस्त्यावर उतरले आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन ते तालिबानच्या विरोधात घोषणा देतायत. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला, तर काही ठिकाणी तालिबानचा राष्ट्रध्वज फाडण्यात आला.

तालिबानच्या दहशतीला न जुमानता अफगाणी नागरिकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन
आणखी एका भारतीय खेळाडूचा क्रिकेटमधून संन्यास; USA कडून खेळण्याची शक्यता

देशाचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घना हे जरी पळून गेले असले तरी देशाचे उप राष्ट्रपती अजूनही देशातच आहेत. त्यांनी स्वतःला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केलं असून तालिबान विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. ते अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतात आहेत. ह्या प्रांतातून तालिबानला मोठा विरोध होतोय, त्यामुळे हा एकमेव प्रांत अजूनही तालिबानच्या ताब्यात नाही.

Edited By - AKshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com