पुणे: सरकारने सोशल मीडिया Social Media आणि टेक कंपन्यांसाठी नवा आयटी IT कायदा आणला. तथापि, सुरुवातीला यासाठी खूप विरोध झाला. पण आता या आयटी कायद्यानुसार भारतात एका महिन्यात 20 लाखाहून अधिक व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी Ban घातली आहे.
15 मे ते 15 जून दरम्यान प्लॅटफॉर्मच्या सेवांचे उल्लंघन केल्याबद्दल व्हॉट्सअॅपने अलीकडेच सुमारे 20 दशलक्ष भारतीय खात्यांवर आपली कंप्लेंट जाहीर करून बंदी घातली आहे.
हे देखील पहा-
20 लाखांहून खाते केले बॅन:
फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपने पुष्टी केली आहे, असे म्हटले आहे की भारतात एका महिन्यात ज्याचा देशाचा कोड +91 आहे त्या 20,11,000 खात्यांवर आहे बंदी घातली आहे. जागतिक स्तरावर व्हॉट्सअॅपने बंदी घातलेल्या एकूण खात्यांपैकी 25 टक्के भारताचा वाटा आहे. व्हॉट्सअॅपने नोंदवले आहे की, जागतिक स्तरावर दरमहा सरासरी 8 दशलक्ष खात्यांवर बंदी घातली जाते.
काय आहे कारण :
व्हॉट्सअॅपने या खात्यांवर बंदी आणण्याचे कारण सांगण्यात आले आहे की, ही खाती हानीकारक माहिती Harmrful Content शेअर करण्यासाठी वापरली जात होती. त्या खात्यांवर बंदी घातली गेली आहे, जी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पॅम पसरवत असे. त्याच वेळी, अशा खात्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे ज्यांच्या संदेशामुळे लोक तक्रारी करतात. त्याचबरोबर काही खात्यांना आक्षेपार्ह संदेशासाठीही बंदी घातली आहे.
व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच अनेक गोपनीयता धोरणे Privacy Policy आहेत. त्याचबरोबर आता आयटी नियमानंतर कायदे खूप कठोर झाले आहेत. आपण अन्य वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात स्पॅम Spam संदेश पाठविल्यास तुमच्या खात्यावर बंदी येऊ शकते. जर कोणी हिंसा भडकवल्यास किंवा आक्षेपार्ह संदेश पाठवला तर त्याच्याविरूद्ध कठोर पावले उचलली जाऊ शकतात.
त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवर जर तुम्ही एखाद्याला धमकावल्यास किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तरीही अकाउंट्सवर बंदी येऊ शकते. जर तुम्हाला तुमचे खाते सुरक्षित ठेवायचे असेल आणि त्यावर बंदी येऊ द्यायची नसेल तर, कोणत्याही वापरकर्त्यास अनावश्यक संदेश पाठवू नका. त्याच वेळी, आक्षेपार्ह आणि हिंसक संदेश पसरवू नका.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.