तब्बल 2,32,500 युनिटची वीज चोरी ! स्मार्ट वीज चोरांवर महावितरणाची कारवाई

महावितरण ने केला ३९.८९ लाखाचा दंड वसूल तर ५ ग्राहकांवर फौजदारी होणार दाखल
तब्बल 2,32,500 युनिटची वीज चोरी ! स्मार्ट वीज चोरांवर महावितरणाची कारवाई
तब्बल 2,32,500 युनिटची वीज चोरी ! स्मार्ट वीज चोरांवर महावितरणाची कारवाईअरुण जोशी
Published On

अरुण जोशी

अमरावती: महावितरण शहर विभागाच्यावतीने थेट हूक टाकून वीज चोरी करणे, मीटरमध्ये फेरफार करून मीटर संथ करणे यासोबतच रिमोट कंट्रोलने वीज चोरी करून स्वत:ला स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांवर मोठी कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल ४३ लाखाची दंडात्मक कारवाई Punitive action करण्यात आली आहे. त्यामुळे रिमोटने वीज चोरी करून स्मार्ट समजणाऱ्या वीज चोरांचेही धाबे चांगलेच दणाणले आहे.

शहरात मीटर Meter संथ करणारी तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोलची किट Remote Control Kit बसविणारी टोळी सक्रीय झाली होती. त्यामुळे शहरात स्मार्ट Smart वीज चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर Suchitra Gujar यांच्या मार्गदर्शनात आणि अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या पुढाकाराने महावितरणकडून वीज चोरी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

हे देखील पहा-

या मोहिमेत 2,32,500 युनिटची वीज चोरी 93 वीज चोरांनी केली असल्याचे आढळून आले. त्यामुळे या वीज चोरांवर तब्बल 43 लाखाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 39.89 लाखाचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत सापळा Trap रचला गेला होता. रिमोट कंट्रोल तसेच मीटर संथ करणाऱ्या टोळीसाठी हा सापळा रचला होता. आता मात्र थेट त्यांच्या विरोधात फौजदारी CRPC गुन्हा Crime दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहेत. याशिवाय जो वीज चोरीची दंडात्मक रक्कम भरणार नाही त्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमचा खंडित करण्यात येणार आहे.

तब्बल 2,32,500 युनिटची वीज चोरी ! स्मार्ट वीज चोरांवर महावितरणाची कारवाई
आश्चर्यच! "ह्या" गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास

कारवाई करण्यात आलेले ९३ वीज चोर आहेत. त्यापैकी चोरांपैकी २४ वीज चोर हे शहर उपविभाग १, उपविभाग-२ मधील ४७ आणि उपविभाग -३ मधील २२ चोर आहेत. थेट वीज चोरी करणाऱ्या या ग्राहकांचे वीज मीटर तपासले झाली आणि त्यात वीज चोरीचे अफलातून प्रकार उघडकीस आले. मीटरमध्ये रिमोट किट बसवून दुरूनच मीटर बंद करायचा, मीटरमध्ये चीप Chip बसवून मीटर संथ करून टाकायचा, मीटरला मागच्या बाजूने छिद्र करायचे आणि मीटरमध्ये रेजिस्टंट तयार करणे. तसेच मीटर बायपास Bypass करून थेट वीज पुरवठा घेणे. असे एका चढ एक प्रकार उघडकीस आले आहे.

विशेष म्हणजे रिमोटव्दारे Remote वीज चोरी ९३ पैकी १० ग्राहक करत असल्याचे उघडकीस आले. याशिवाय काही म्हणजे ३ ग्राहक थेट हूक टाकून वीज Electricity चोरी करत असल्याचे समोर आले. कार्यकारी अभियंता Executive Engineer आनंद काटकर यांच्या नेतृत्वात आणि शहरातील तीनही उपविभागाचे अतीरिक्त कार्यकारी अभियंते प्रदिप अंधारे, संजय कुटे आणि संजय गीरी यांच्या विशेष सहभागाने सुरू असलेली महावितरणची विशेष मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेत नियोजनबध्द संशयीत ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com