आश्चर्यच! "ह्या" गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास

खरबी गावात वन्य प्राण्याच्या धुमाकुळ मुळे आपले पिक वाचविन्यासाठी शेतकरी करतात शेतात जागरण.
आश्चर्यच! "ह्या" गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास
आश्चर्यच! "ह्या" गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

भंडारा: खरबी Kharbi ह्या गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास ! ऐकून धक्का बसला ना ? पन हे खरे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या गावातील शेतकऱ्यांना झोप न यायची बिमारी तर झाली नाही ना ? नाही नाही अस काहीच प्रकार ह्या गावात नाही. आपल्या पिक संरक्षणासाठी खरबी गावातील शेतकऱ्यांचा केवळ 3 तास झोपुन शेतात रात्रभर जागर असतो.

भंडारा तालुक्यातील नागपुर Nagpur जिल्हा लगत राष्टीय महामार्ग 6 वर असलेले 5000 लोकसंख्येचे खरबी हे गाव आहे. ह्या गावात 99.99 टक्के शेतकरीच आहेत. ह्या गावात रात्री चे नऊ वाजले की गावात एकच लगबघ सुरु होऊन जाते. कसे तसे झोप मोड़ करत गावातील सर्व शेतकरी बॅटरी, लाठ्या काठी,घोंगसी (रेनकोट) घेऊन शेताकडे पळू लागतात.

हे देखील पहा-

कारण ह्या गावालगत असलेल्या खरबी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राणी ठान मारून बसतात. जवळ जवळ 50 ते 100 हरणाचे कळप तर कधी रानडुक्करांच्या झुंड शेतात बसून शेतातील सोयाबीन, तुर खाऊन फस्त करतात।यात रानडुक्कर तर चक्क शेतात पिक उपड़ून जागो जागी खड्डे करून ठेवत आहे. यामुळे शेतातील उभे पिक वन्य प्राण्यामुळे भुई सपाट होत असून ह्या गावातील बळीराजा हतबल झाला आहे.

त्यामुळे घाम गाळून ,कर्ज घेऊन उभे केलेले पिक वाचविन्यासाठी खरबी गावातील लोकांची रात्रभर जागरण असते. सकाळी 6 वाजता पासुन दिवसभर शेतात राब राब राबुन संध्याकाळी 6 वाजता घरी जाऊन गावातील शेतकरी जेवन करून झोपी जातात. नंतर रात्री 9 वाजले की शेतात जाऊन आपल्या शेतात आलेल्या वन्य प्राण्याना हुसकावून लावतात. कधी आरडाओरड तर कधी ताट वाजवून जीवाचा आकंता करत वन्य प्राण्याना पिका पासुन दूर करण्यासाठी रात्रभर त्यांचा आटापीटा सुरु असतो.

आश्चर्यच! "ह्या" गावात शेतकरी झोपतात केवळ 3 तास
गॅस मेकॅनिक असल्याचे भासवून गंडवणारा भामटा सीसीटीव्हीत कैद

ह्या आटापिटा केवळ खरबी गावाचाच नाही तर चिखली, खमारी इत्यादि अनेक गावात हिच समस्या आहे. कधी उन्ह तर कधी पाऊस ही छोटया समस्ये बरोबर सरपटनारे प्राणी यांच्या पासुन ही जागरण करण्याऱ्या शेतकऱ्यांना बचाव करावा लागतो. काही वेळा तर जंगली डुकरांसारख्या हिंस्र प्राण्याशी झगडावे लागते. यात खरबी गावातील अनेक शेतकरी गंभीररित्या जखमी ही झाले आहे. त्यामुळे आता ह्या हिंस्र प्राण्यासह पिकांची नासधुस करणाऱ्या प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी शेतात तारांचे कुंपन व सौर कुंपन लाऊन देण्याची मागणी जोर धरत आहे.

जिल्ह्यात मुख्य पिक धान पिक असले तरी आसमानी व सुल्तानी संकट बघता जिल्हातील शेतकरी आता तुर,सोयाबीन, चना ह्या नगदी पिकांकडे वळला आहे. पिक उत्तम येईल व दोन पैसे ज्यादा पडेल ह्या आशेवर हे नगदी पीके आपल्या शेतात लावले खरे मात्र अश्या वन्य प्राण्याच्या नास धुसीने जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला असून नुकसान भरपाई ची मागणी करत आहे. खरबी गावातील शेतकऱ्यांचे पिक वाचविन्यासाठी धडपड बघता "जगने किती कठिन" ह्या उक्तिची सतत स्मरन येत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com