Political News: गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर होते. येथे व्हाईट हाऊसमध्ये त्यांची विशेष सोय करण्यात आली होती. त्यांच्यासह येथे जेवण केलेल्या एका उद्योगपतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. जेम्स क्राऊन असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. (Latest Marathi News)
वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन उद्योगपती तसेच अब्जाधीश गुंतवणूकदार जेम्स क्राउन यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. जेम्स आपला ७० वा वाढदिवस साजरा करुन घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.
मीडिया रिपोर्टनुसार, जेम्स क्राउन हेन्री क्राउन अँड कंपनीचे अध्यक्ष होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेम्स यांना रुग्णलयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, जेम्स यांच्या मृत्यूचे कारण सध्या तरी अपघात (Accident) दिसत आहे. लवकरच पोस्टमार्टम रिपोर्टनंतर खरं कारण समोर येईल.
अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे जेम्स यांच्या कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला आहे. क्राउन कुटुंब शिकागोमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. जेम्स यांच्यावर हेन्री क्राउन आणि फर्मच्या सीईओ पदाची जबाबदारी होती. आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त सुमारे १०.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती त्यांच्याकडे वारसाहक्काने मिळालेली होती. क्राउन कुटुंबियांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत गोपनीयतेचा आदर बाळगण्याची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.