उत्तराखंडमधून भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. नैनितालमध्ये सुमारे ३२ प्रवासी घेऊन निघालेली हरियाणाची स्कूल बस काळाढुनगी रोडवरील नालनी येथे दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २९ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरियाणाच्या (Hariyana School Bus) हिसारमधील शाहपूर गावात असलेल्या न्यू मानव इंटरनॅशनल स्कूलमधील ३४ जण शनिवारी नैनितालला आले होते. रविवारी घरी परतत असताना त्यांच्या बसचा नैनितालच्या घटगडजवळ रविवारी (८, सप्टेंबर) भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. सर्व जखमींना हल्द्वानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ५ महिला कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या बचाव पथकांनी पोलिसांसह संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि बसमधून जखमींना बाहेर काढत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
या बसमध्ये शिक्षक, शाळेचे कर्मचारी आणि काही मुलेही प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याआधीही उत्तराखंडमधील गंगोत्री धाम येथून परतणाऱ्या गुजरातमधील प्रवाशांना घेऊन जाणारी बस गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दरीत कोसळली होती. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.