खराब वातावरणामुळे स्पाइसजेटच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात; १७ प्रवासी जखमी

स्पाईसजेटचे विमान एसजी- ९४५ या विमानाचा दुर्गापूर विमान तळावर लँडिंगदरम्यान खराब वातावरणामुळे अपघात झाला आहे.
SpiceJet
SpiceJetSaam Tv
Published On

नवी दिल्ली: स्पाइसजेटच्या (SpiceJet) मुंबई-दुर्गापूर या विमानाचा रविवारी पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर विमानतळावर लँडिंग दरम्यान अपघात झाला आहे. खराब वातावरणामुळे हा अपघात (Accident) झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या अपघातात तीन केबिन क्रू जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात १४ प्रवासी तर ३ केबिन क्रू जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई सुरक्षाचे संचालक एचएन मिश्रा या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

हे देखील पाहा

१ मे रोजी, स्पाइसजेटचे बोईंग B737 हे विमान दुर्गापूर विमानतळावर लँडिंग करत असताना खराब वातावरणामुळे अपघात झाला. यात काही प्रवासी जखमी झाले आहेत. विमान दुर्गापूर येथे लँडिंग झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. प्रवाशांना सर्व मदत केली जाईल, अशी माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com