Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Satyendar Jain News: तब्बल 873 दिवसांनी आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक?
Satyendar Jain Bail NewsSaam Tv
Published On

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाला आहे. सत्येंद्र जैन यांना तब्बल अडीच वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. त्याच्या जामीन याचिकेवर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी निर्णय दिला. 30 मे 2022 रोजी अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र जैन यांना 873 दिवसांनंतर नियमित जामीन मिळाला आहे.

याआधी ते काही महिन्यांसाठी अंतरिम जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. जैन यांना दिलेला नियमित जामीन हा सत्याचा विजय असल्याचे, आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

सत्येंद्र जैन यांना का करण्यात आलं होतं अटक?

सत्येंद्र जैन यांना ईडीने चार कथित संबंधीत कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे म्हणाले, 'या खटल्याला झालेला विलंब, 18 महिन्यांचा दीर्घ कारावास आणि खटला सुरू होण्यास बराच कालावधी लागणार आहे, हे पाहता आरोपींना दिलासा मिळायला हवा.' न्यायाधीशांनी 50,000 रुपयांचा जामीन बॉण्ड भरण्यास सांगत त्यांना दिला.

जैन यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना आणखी कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही. जैन यांची सुटका झाल्यास ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, असे म्हणत ईडीने जामीन अर्जाला विरोध केला होता.

सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक?
Thackeray Group Vs Congress: मविआच्या जागावाटपाचा वाद विकोपाला, पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही; ठाकरे गटाची भूमिका: सूत्र

सत्येंद्र जैन यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की, 'राऊस एव्हेन्यू ट्रायल कोर्टाने सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ काळ तुरुंगात राहून त्यांना त्रास सहन करावा लागल्याचे ट्रायल कोर्टाने सांगितले. अद्याप खटला सुरू झालेला नाही. ट्रायल कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या निकालाच्या आधारे हा निर्णय दिला. कलम 21 ला प्राधान्य देत न्यायालयाने त्याला जामीन मिळण्यास पात्र मानले आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com