Gujarat Elections: गुजरातेत 'आप'कडून काँग्रेसला झटके

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने कॉंग्रेसला झटके देण्यास सुरवात केली आहे.
Gujarat Elections: गुजरातेत 'आप'कडून काँग्रेसला झटके
Gujarat Elections: गुजरातेत 'आप'कडून काँग्रेसला झटकेSaam TV

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने कॉंग्रेसला झटके देण्यास सुरवात केली आहे. गुजरात काँग्रेसचे अनेक नेते या पक्षात सामील होत आहेत. राजकोटमधील काँग्रेसचे माजी आमदार इंद्रनील राजगुरू आणि राजकोटचे माजी उमेदवार वसराम सगठिया यांनी नुकताच त्यांच्या समर्थकांसह ‘आप’मध्ये प्रवेश केला आहे. (AAP Giving jolts to congress before Gujarat Elections)

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात गुजरातमधील अनेक कॉंग्रेस (Congress) नेते असल्याचा दावा देखील या पक्षाने केला आहे. या पक्षांतराबाबत केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘इंद्रनील राजगुरू आणि वसरामभाई सगठिया यांचे आम आदमी पक्षात स्वागत करतो. आपण सर्वांनी मिळून गुजरातच्या लोकांच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.’’

Gujarat Elections: गुजरातेत 'आप'कडून काँग्रेसला झटके
पंजाब सरकारचे 1 महिन्याचे रिपोर्ट कार्ड जारी; 300 युनीट वीज मोफत देणार

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधील नेत्यांचे पक्षांतर होत असल्याने कॉंग्रेसलाही त्याबद्दल रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर हे गुजरातमध्ये होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

इंद्रनील राजगुरू, वसराम सगठिया यांनी काल केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. राजगुरु म्हणाले, ‘‘आम आदमी पक्षाने पंजाब आणि दिल्ली ही राज्ये जिंकून ‘आप’ केवळ विकासाचे राजकारण करते हे सिद्ध केले.’’ सगठिया म्हणाले, ‘‘भाजप सत्तेत असून जनतेला मूर्ख बनवत आहे आणि भाजपसमोर उभे राहण्याची क्षमता काँग्रेसने गमावली आहे. त्यामुळे राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार येणार आहे.’’

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com