US Bomb Cyclone: अमेरिकेत (America) स्नोबॉम्ब चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळाने आता पर्यंत १८ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. ऐन नाताळ आणि नव वर्षाच्या आगमनावेळी वादळ आल्याने सर्वच आनंदाच्या क्षणाला विरझन लागले आहे. सध्या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा बंद करण्यात आली आहे. जे प्रवासी आधीच आले आहेत ते देखील विमानतळावर अडकले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, आपत्कालीन सेवा पुरवणे देखील कठीण झाले आहे. (Latest US Bomb Cyclone News)
वैद्यकीय पथक न पोहचल्याने अनेकांचा मृत्यू
राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, अनेक ठिकणी तापमाणाचा पारा -४८ अंशापर्यंत घसरला आहे. तसेच शहरात वीज पुरवठा खंडीत झाला असून १.७ दशलक्ष घरांमध्ये वीज बंद आहे. बाहेर स्नोबॉम्ब चक्रीवादळ सुरू असताना घरातील वीजेच्या उपकरणांमधून उष्णता मिळवणे देखील शक्य नाही. न्यूयॉर्कच्या बफेलो भागात देखील ३ व्यक्तींचा मृत्यू झाला. हवामानामुळे या व्यक्तींची प्रकृती खालावली होती. अशात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देखील त्यांच्या पर्यंत पोहचू शकत नव्हत्या. त्यामुळे घरातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
देशातल्या सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक ग्रिडने सांगितले आहे की, पूर्व अमेरिकेच्या ६.५ दशलक्ष व्यक्तींना ब्लॅकआउटमध्ये जगावे लागेल. या आठवड्याच्या सुरुवातीलाच वादळाने (Cyclone) धडक दिली. तेव्हा पासून परिस्थिती आणखीन खराब होत चालली आहे. शनिवारी सुमारे २०० दशलक्ष व्यक्ती हवामानाच्या अंदाजावर काम करत होत्या.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांवरील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ८ वाजता वॉशिंग्टनमधील एकूण ४४९ विमाणे रद्द केली गेली. यात शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व फ्लाईट बंद करण्यात आल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये देखील ५१ उड्डाणे रद्द करण्यात आलीत.
स्नोबॉम्ब चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय?
अमेरिकेत गेल्या ७ दिवसांपासून स्नोबॉम्ब चक्रीवादळ सुरू आहे. इथे हमानात आणखीन बिघाड होण्याची शक्यता आहे. जेव्हा अतिशय वेगाने कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याची दाहकता तिव्र असते. त्याला बॉम्ब चक्रीवादळ म्हणतात. यात २४ तासांत हवेचा दाब २४ मिलीबारने घटतो. हवामानाच्या याच स्थितीला बॉाम्ब चक्रीवादळ म्हटले आहे. हे वादळ शक्यतो समुद्रात येते. मात्र पाऊस आणि बर्फाच्या स्वरूपात बॉम्ब हल्ल्याप्रमाणे ते जमिनीवर आदळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.