Viral Vide
Viral VideSaam TV

Viral Video: दोन तरुणींमध्ये एकाच मुलावरून जोरदार भांडण; हाणामारी पाहून तरुण इतका घाबरला की,...

यात प्रेयसी आणि तरुणाची दुसरी मैत्रीण या दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे.

Viral Video News: सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रेम हे नेहमी आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमात व्यक्ती सर्व संकट पार करू शकतो. मात्र जर आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर दुसरी मुलगी अथवा मुलगा दिसला की प्रत्येकाच्या मनात थोडा का होईना राग निर्माण होतो. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात प्रेयसी आणि तरुणाची दुसरी मैत्रीण या दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे. यावेळी दोघींची भांडणं सोडवण्याऐवजी प्रियकराने घाबरुन तेथून पळ काढलाय. (Latest Viral Video)

उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये दोन तरुणींची बेदम हाणामारी पाहून तरुण देखील घाबरून गेलाय. रविवारी वाराणसीच्या बाजार परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांना या हाणामारीची माहिती मिळताच त्यांनी इथे धाव घेतल्यावर या दोन्ही तरुणी शांत झाल्या.

Viral Vide
Himachal Pradesh Earthquake : धर्मशाळा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

मिळालेल्या माहितीनुसार, यातील एक तरुणी ही तरुणाची प्रेयसी आहे. गेल्या २ वर्षांपासून ते दोघे एकत्र आहेत. संक्रांतीतच्या दिवशी भेटण्याचे त्यांनी ठरवले होते. ठरल्याप्रमाणे तरुणी त्याला भेटण्यासाठी आली तेव्हा लांबूनच तिने पाहीले की, तिचा प्रियकर एका तरुणीसोबत बोलत आहे. याचा तिला खूप राग आला आणि तिने थेट रस्त्यावरच त्या दुसऱ्या तरुणीच्या झींज्या पकडल्या.

Viral Vide
Viral News: अजब प्रथा! धार्मिक स्थळावर तरुणी 'ब्रा' काढून करतात पूजा; नेमकं कुठे आहे हे ठिकाण?

दुसरी तरुणी ही तरुणाची एक साधी मैत्रीण होती. त्या दोघांमध्ये मैत्री व्यतिरिक्त काही नव्हते. मात्र तरुणाच्या प्रेयसीने काहीच एकूण न घेता तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली. रसत्यावर उपस्थित काहींनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com