धक्कादायक! 12 मिनिटांत 84 लाखांची लूट

बिहार मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
धक्कादायक! 12 मिनिटांत 84 लाखांची लूट
धक्कादायक! 12 मिनिटांत 84 लाखांची लूटSaam Tv
Published On

नवी दिल्ली : बिहार Bihar मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गया या ठिकाणी एका गोल्ड लोन कंपनी Gold Loan Company मध्ये दरोडा टाकून दरोडेखोरांनी भर दिवसा लाखो रुपये लुटल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी ४ दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत कंपनीमध्ये शिरले. २ किलो सोनं Gold आणि ३ लाख ३६ हजारांची रोख रक्कम Cash लुटून नेण्यात आली आहे.

अवघ्या १२ मिनिटांमध्ये त्यांनी तब्बल ८४ लाखांची लूट केलेली आहे. य़ाप्रकरणी पोलिसांत Police तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ब्रांचचे असिसटेंट हेड मनजीत कुमार सिंह यांनी याविषयी माहिती दिली आहे. वजीरगंज बाजारपेठेत Wazirganj market आशीर्वाद गोल्ड लोन ही एक संस्था आहे. शाखेमध्ये चौकशी करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला २ जण आतमध्ये आले.

हे देखील पहा-

यानंतर थोड्या वेळाने त्यांचे आजून २ साथीदार आत आले. त्यांनी अचानक खिशामधून बंदूक काढून कर्मचाऱ्यांना धमकावले आणि त्यांच्या कडून मोबाईल काढून घेतले आहे. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एका कोपऱ्यामध्ये नेऊन उभे केले होते. दरोडेखोरांनी संस्थेमधील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून लॉकरची चावी मागितली होती.

ती चावी मिळाल्यावर त्यांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चुकीच्या पद्धतीने लॉकर उघडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे सायरन वाजायला सुरुवात झाली. सायरन वाजल्याचे बघून दरोडेखोरांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न थांबवला होता. कर्मचाऱ्यांना पुन्हा धमकावले. तातडीने सायरन बंद केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

धक्कादायक! 12 मिनिटांत 84 लाखांची लूट
Aurangabad Breaking | धक्कादायक;बॅंकवाल्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पाहा व्हिडिओ

यामुळे कर्मचाऱ्यांनी अलार्म बंद केला आणि नंतर दरोडेखोरांनी लॉकर उघडून त्यामधून २ किलो सोनं आणि ३ लाख रुपये लंपास केले आहे. लुटायचा प्रकार झाल्यानंतर दरोडेखोरांनी बाईकवरून पळ काढला आहे. दरोडेखोर २ वेगवेगळ्या बाईकवरून वेगवेगळ्या दिशेला फरार झाले. ही संपूर्ण घटना झाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस पुढील तपास करत आहेत. या बाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com