७ भारतीय आणि एका पाकिस्तानी Youtube Channel वर बंदी; केंद्रानं सांगितलं कारण

देशाविरोधात खोटी माहिती पसरवून दुष्प्रचार करणाऱ्या युट्यूब चॅनलवर केंद्र सरकारनं पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे.
list of youtube channels banned in india
list of youtube channels banned in india saam tv
Published On

Youtube Channel Ban | नवी दिल्ली: भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर कारवाईचा बडगा उगारला आहे. केंद्राने कथितरित्या दुष्प्रचार करणाऱ्या ८ युट्यूब चॅनल्सवर कारवाई करत बंदी घातली आहे. या ८ युट्यूब चॅनलपैकी ७ भारतीय आणि एका पाकिस्तानी चॅनलचा समावेश आहे. (Youtube Channel Ban List)

list of youtube channels banned in india
मोदी सरकारचा जबरा स्ट्राइक! २२ युट्यूब चॅनल केले ब्लॉक, यादी वाचा!

केंद्र सरकारने (Government) दुष्प्रचार करणाऱ्या सात भारतीय (Indian) आणि एका पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण केंद्र सरकारने ही कारवाई करताना दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक व्यवस्थांसंदर्भात दुष्प्रचार करत असल्याने या युट्यूब चॅनलवर (Youtube Channel) बंदी घातली आहे.

list of youtube channels banned in india
Dubai Youtube Star : दुबई मधील एक युट्यूब स्टार ग्लास बाॅक्समध्ये बंद,पाहा व्हिडीओ

आयटी नियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे, त्यांचे १४४ कोटी व्ह्यूज आणि ८५.७३ लाख सबस्काइबर्स होते. या चॅनलच्या माध्यमातून भारताविरोधी खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं.

केंद्र सरकारने सांगितले की, २०२१ -२२ या कालावधीत ७८ युट्यूबवरील वृत्तवाहिन्यांवर प्रतिबंध घालण्यात आले होते. तर ५६० युट्यूब लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या होत्या. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जुलैमध्ये लोकसभेत सांगितले होते की, आयटी नियमांतर्गत कलम ६९ एचे उल्लंघन केल्याप्रकरणी या चॅनल्सवर बंदी घालण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com