7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; पुढील महिन्यात DA वाढण्याची शक्यता

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी खूशखबर आहे.
DA hike for central Government employees Latest Update
DA hike for central Government employees Latest UpdateSAAM TV

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासंबंधी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात अर्थात जुलैमध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA - Dearness Allowance) आणि डीआरमध्ये वाढ केली जाऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार १ जुलै रोजी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Central Government Employees) महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ लागू करू शकते. दरम्यान, ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आधारे सरकारकडून जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित महागाई भत्ता जाहीर केला जातो.

DA hike for central Government employees Latest Update
केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर 

या वर्षी जानेवारीत सरकारने सातव्या वेतन (7th Pay Commission) आयोगानुसार, महागाई भत्ता वाढीची घोषणा केली होती. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीए आणि डीआरमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली होती.

इतका वाढू शकतो महागाई भत्ता!

एप्रिल, मे आणि जून महिन्यांत एआयसीपीआय (ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स) १२६ हून अधिक असल्यामुळे महागाई भत्ता (DA) चार टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एआयसीपीआय अनुक्रमे १२५.१ आणि १२५ होता. तर मार्चमध्ये तो वाढून १२६ इतका झाला आहे. जर एआयसीपीआय त्या पातळीवर पोहोचला आहे, तर डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ होईल असे अपेक्षित आहे.

DA hike for central Government employees Latest Update
Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार, महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार

सद्यस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या बेसिक सॅलरीवर ३८ टक्के महागाई भत्ता मिळू शकतो. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) तर निवृत्ती वेतनधारकांना डीआर दिला जातो.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी बेसिक सॅलरी (Salary) आणि सध्याचा मिळणारा महागाई भत्ता बघितला तर, त्यांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८ हजार रुपये आहे आणि त्याला सध्या ३१ टक्के महागाई भत्त्याच्या दराप्रमाणे ६१२० रुपये महागाई भत्ता मिळत आहे. जुलैमध्ये महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ झाली तर, त्या कर्मचाऱ्याला ६८४० रुपये महागाई भत्ता मिळेल. तर नव्याने वाढणाऱ्या महागाई भत्त्यात ७२० रुपयांची भर पडेल.

वर्षातून दोनदा वाढवला जातो महागाई भत्ता

महागाई कमी करण्यासाठी सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ करते. महागाई किंमत निर्देशांक या वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची अधिक शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com