Corona News: भय इथले संपत नाही; गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७७४ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

Corona In India: कोरोनाचं भय काही संपत नाहीय. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ७७४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा मृत्यू झालाय.
Corona News Updates
Corona News UpdatesSaam Tv
Published On

Corona Update In India

कोरोना पुन्हा घाबरवताना दिसत आहे. देशभरात कोरोनाच्या (corona) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत कोविडचे ७७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला जातोय, असं का? ते आपण जाणून घेवू या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार १८७ आहे. आज सकाळी ८ वाजता मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत तामिळनाडू आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. (latest corona update)

कोरोनाच्या तीन लाटा

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून JN.१ च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळतेय. परंतु रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. तसंच मृत्यूदरात कोणतीही वाढ झालेली नाही. सध्या देशातील ९२ टक्के कोरोना सक्रिय रुग्णांना घरीच अलग ठेवण्याचा सल्ला दिला जातोय. (corona death)

आतापर्यंत भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या (corona death) आहेत. साडेचार कोटींहून अधिक लोकांना या महामारीची लागण झाली आहे. ५.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या आजारातून बरं झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटींहून अधिक आहे. आतापर्यंत देशात २२०.६७ कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Corona News Updates
Kidney Health: हात-पाय सतत सूजतात? असू शकते किडनी खराब, ही लक्षणे दिसातच व्हा सावध

JN.१ ची लक्षणं

गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या JN.१ व्हेरियंटच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली आहेत. या व्हेरियंटचा संसर्ग वेगाने होतोय. तरी बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. ताप, खोकला, सर्दी, घसा खवखवणे, अंगदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं व्हायरल फ्लू किंवा इतर श्वसन आजाराशी संबंधित आहे.

Corona News Updates
Health Tips: तुम्हालाही सतत भूक लागतेय? मग हे वाचाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com