Wolf Dog: ७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, किंमत ५० कोटी; या भारतीयाने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा

Indian Dog Lover Buys World's Most Expensive Wolf Dog: बंगळुरूमधील एका श्वासप्रेमीने तब्बल ५० कोटी रुपयांमध्ये वुल्फडॉग खरेदी केला. सध्या या कुत्र्यांची आणि त्याच्या मालकाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
Wolf Dog: ७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, किंमत ५० कोटी; या भारतीयाने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा
Wolf Dogsaam Tv
Published On

बंगळुरूच्या श्वानप्रेमीची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या श्वानप्रेमीने तब्बल ५० कोटी रूपयांना जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी केला आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे या कुत्र्यांची आणि या श्वानप्रेमीची जोरदार चर्चा सुरू आहे. जेव्हा प्रामाणिकपणा आणि इमानदारीची गोष्ट येते तर सर्वात आधी कुत्र्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे माणसाला देखील कुत्रे प्रचंड आवडतात. अनेक जण कुत्र्याला पाळतात. जगभरात असे अनेक व्यक्ती आहेत जे हजारो-लाखो रुपयांमध्ये परदेशी कुत्रे खरेदी करतात. पण तुम्ही जगातील सर्वात महागड्या कुत्र्याबद्दल ऐकले नसेल. त्याची किंमत तब्बल ५० कोटी असून एका भारतीय व्यक्तीने हा कुत्रा खरेदी केला आहे.

७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, लांडग्यासारखा बलवान आणि चपळ असणाऱ्या या कुत्र्याला वुल्फडॉग म्हणतात. हा कुत्रा त्याच्या ताकदीसाठी आणि लांडग्यासारख्या चेहऱ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कुत्र्याची किंमत देखील जास्त असून तो जगातील सर्वात महागडा कुत्रा आहे. भारतात एक अशी व्यक्ती आहे जी श्वानप्रेमी असून या व्यक्तीने ५.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ५० कोटींना हा कुत्रा खरेदी केला. एस सतीश असे या श्वान प्रेमीचे नाव असून ते बंगळुरूतील प्रसिद्ध डॉग ब्रीडर आणि भारतीय डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

Wolf Dog: ७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, किंमत ५० कोटी; या भारतीयाने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा
Stray Dogs: ७ वर्षीय चिमुरड्यावर ५ कुत्र्यांचा बिबट्यांसारखा हल्ला, शेतात नेलं अन् अंगाचे लचके तोडले, ११० टाके

सतीश यांच्याकडे आधीच १५० हून अधिक कुत्रे आहेत. त्यांना वेगवेगळ्या जातींचे कुत्रे पाळण्याची आवड आहे. ते ७ एकर जागेवर राहतात. याठिकाणी प्रत्येक कुत्र्यासाठी २० फूट बाय २० फूट खोली आहे. या सर्व कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी ६ जणांना कामाला ठेवले आहे.. ते या कुत्र्यांना प्रदर्शनांमध्ये घेऊन जातात आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवतात. आता त्यांनी वुल्फडॉग खरेदी केला आहे. ५० कोटींचा हा वुल्फडॉग दुर्मिळ कुत्रा आहे. या कुत्र्याला कॅडाबॉम्स ओकामी असे नाव देण्यात आले आहे. कॅडाबॉम्स ओकामी हा लांडगा आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्यातील संकरातून जन्मलेला हा कुत्रा आहे. ही दुर्मिळ प्रजाती अमेरिकेत जन्माला आली आहे.

Wolf Dog: ७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, किंमत ५० कोटी; या भारतीयाने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा
Dog Vaccine: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, लसीकरणासाठी थेट लंडनमधून खास पथक

वुल्फडॉग ८ महिन्यांचा असल्यापासून या कुत्र्याचे वजन ७५ किलोपेक्षा जास्त आहे. हा कुत्रा दररोज ३ किलो कच्चे मांस खातो. या कुत्र्याच्या खाण्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत त्याच्या देखभालीवर दररोज हजारो रुपये खर्च होतात. सतीश यांच्या म्हणण्यानुसार, त्याला गेल्या महिन्यातच एका दलालाकडून या कुत्र्याबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी वुल्फडॉग खरेदी केला. या प्रकारचे कुत्रे विशेषत: जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान आणि रशियाच्या काही भागात आढळतात.

Wolf Dog: ७५ किलो वजन, लांडग्यासारखा चेहरा, किंमत ५० कोटी; या भारतीयाने खरेदी केला जगातील सर्वात महागडा कुत्रा
Dog paragliding with owner: कुत्र्याने केले मालकासोबत पॅराग्लायडिंग, असा 'थ्रील' योग्य की अयोग्य? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com