

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात काल रात्री बसचा भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर 45 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बाकरपेटा येथे हा अपघात झाला. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उंच कड्यावरून खाली कोसळली आणि हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून ही खाजगी बस लग्नाचं वऱ्हाड घेऊन चित्तूरमधील नागरीजवळील एका गावाकडे निघाली होती. बस घाटातून जात असताना अडुपुटप्पी दरीत कोसळली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर बचावकार्य सुरू झाले. बचाव पथकासह घटनास्थळी उपस्थित लोकांनीही बचाव कार्यात मदत केली. मात्र, दरी 50 फूट खोल असल्याने अंधारामुळे कारवाईत अडथळे येत होते. सकाळपर्यंत बचावकार्य सुरु होतं.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.