Marriage : गोष्ट एका लग्नाची! 6 मुलींचा बाप झाला नवरा; ६५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने केले २४ वर्षांच्या तरुणीशी लग्न

उत्तर प्रदेशच्या बारांबकीमधून एका लग्नाची चर्चा देशभर होत आहे
Unique Wedding In Uttar Pradesh
Unique Wedding In Uttar PradeshSaam tv
Published On

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशच्या बारांबकीमधून एका लग्नाची चर्चा देशभर होत आहे. बारांबकीमध्ये ६ मुलींच्या बापाने २४ वर्षांच्या तरुणीशी विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने त्यांच्या लग्नात जल्लोषात नाचताना दिसत आहे. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जामिन हुसैनपूर गावातील हा प्रकार आहे .या गावात ६ मुलींचा बाप, नातवंड, जावई असताना ६५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने स्वत:हून ४१ वर्षांनी लहान मुलीशी विवाह केला आहे.

व्यक्तीने २४ वर्षांच्या मुलीशी धुमधडाक्यात विवाह (Marriage) केला आहे. वृद्ध व्यक्ती नकछेद यादव यांनी त्यांच्या लग्नाच्या वरातीत देखील जोरदार डान्स केला आहे. रविवारी झालेल्या या लग्नाची चर्चा देशभर होत आहे. (Uttar Pradesh Latest News)

Unique Wedding In Uttar Pradesh
Viral News :'बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं...'; रडत रडत मुलीने केला थेट पोलिसांना फोन, त्यांनी दिलेले उत्तर होतंय व्हायरल

कोण आहे नकछेद यादव यांची नवरी ?

नवरी नंदनीची वय नकछेद यांच्या मुलीच्या वयासमान आहे. नछकेद यांनी त्यांचं दुसरं लग्न हिंदू परंपरेनुसार केलं. त्यांनी लग्न रुदौली परिसरातील कामाख्या देवीच्या मंदिरात केलं. त्यांच्या लग्नात ५० जणांचं वऱ्हाड आणि नातेवाईक होते. (Unique Wedding In Uttar Pradesh)

Unique Wedding In Uttar Pradesh
Viral News : अजबच ! चक्क YouTube ची मदत घेऊन तिने केली शेती, तब्बल 5 लाखांहून अधिक नफा

मिळालेल्या माहितीनुसार, नछकेद यांच्या पहिली पत्नीचे निधन झाल्याने ते एकटे पडले होते. त्यामुळे नछकेद यांनी कुटुंबाच्या सहमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. नछकेद यांनी दुसऱ्या विवाह केल्यानंतर ते खूप आनंदी आहेत. त्यांच्या सर्व मुलांचे लग्न झाले आहेत. मात्र, नछकेद यांच्या लग्नाची चर्चा देशभर होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com