Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये (UP Road Accident) सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्कूल बस आणि कारला भीषण अपघात (School Bus And Car Accident) झाला. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून (Uttar Pradesh Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चुकीच्या दिशेने धावणाऱ्या स्कूल बस कारने जोरदार धडक दिली. क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल विहारसमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. बसमध्ये फक्त चालकच होता. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्वीट करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली. याआधी सोमवारी रात्री उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्येही अपघात झाला होता. याठिकाणी टेम्पो आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अपघातात 5 जण जखमी झाले.
दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये आज प्रवासी बसला भीषण अपघात झाला. ही बस पुलावरुन थेट कालव्यात कोसळली. या अपघातामध्ये बसमधील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.