कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी

A fire broke out at a prison in the western Colombian city of Tolua on Tuesday, killing 51 inmates and injuring 24.
कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी
Saam Tv
Published On

बोगोटा : पश्चिम कोलंबियातील (Colombia) टोलुआ (Tolua) शहरातील तुरुंगात (Prison) आग लागलेल्या आगीत (fire) 51 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 24 जण जखमी (injured) झाले आहेत. मंगळवारी घडलेल्या या घटनेतील जखमींमध्ये सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.

CNN च्या वृत्तानुसार, मंगळवारी पहाटे कोलंबियन तुरुंगात हुल्लडबाजी करून कैद्यांनी गाद्या पेटवल्याने ही घटना घडली. कोलंबियाचे न्यायमंत्री विल्सन रुईझ यांनी पत्रकार परिषदेत घेत या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले पहाटे २ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कैद्यांमध्ये मारामारी झाली. भांडणाच्या वेळी एका कैद्याने गादी पेटवली. त्यानंतर ही आग भडकली.

कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी
Wimbledon 2022 : सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; नदालची आगेकूच

रुईझ म्हणाले, 'ही आग भडकल्याने परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती. अग्निशमन दलास बाेलविण्यात आले. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. या तुरुंगात किरकोळ शिक्षा भोगत असलेले तसेच शेवटच्या काही महिन्यांची शिक्षा पूर्ण करणारे कैदी हाेते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना देशाच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात दुर्देवी घटना ठरली आहे.

कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी
शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्राची मुसंडी अन् राज्यात साता-याची; केंद्राचा अहवाल प्रकाशित

यापूर्वीही झाल्या हाेत्या दंगली

कोलंबिया आणि शेजारच्या देशांमध्ये तुरुंगात मारामारी आणि दंगलीचे प्रकार यापुर्वी देखील घडले आहेत. मार्च 2020 मध्ये, बोगोटा येथील पिकोटा तुरुंगात झालेल्या दंगलीत 24 कैद्यांचा मृत्यू झाला. ते दंडात्मक प्रणालीमध्ये कोरोनाव्हायरस उपायांचा निषेध करत होते. गेल्या वर्षी ब्राझीलच्या तुरुंगात 50 हून अधिक ठार झाले. त्यापैकी 16 जणांचा शिरच्छेद करण्यात आला. सन 2018 मध्ये व्हेनेझुएलाच्या तुरुंगात लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

Edited By : Siddharth Latkar

कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी
भात खाण्याची योग्य वेळ कोणती ? रात्रीच्या वेळी भात खायचा की, नाही जाणून घ्या
कोलंबियाच्या टोलुआ तुरुंगात भीषण आग, 51 कैदी मुृत्यूमुखी; 24 जखमी
सुदृढ बाळाचे दात येण्यास उशीर होत असला, तर घाबरू नका हे उपाय करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com