Bihar News: बिहारमध्ये अवकाळी पावसाचं थैमान; वीज पडून मृत्यू ५ जणांचा मृत्यू

People Death Due To Lightening In Bihar: फक्त महाराष्ट्रात नाही, तर बिहारमध्ये देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वीज पडून मृत्यू
People Death Due To LighteningYandex

फक्त महाराष्ट्रातच नाही, तर बिहारमध्ये (Bihar News) देखील अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात वीज ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहतास जिल्ह्यात काल (११ मे) जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी विज पडून पाचजण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये एका तरूणाचा देखील समावेश आहे. विविध राज्यांमध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे.अनेक नागरिकांचा या पावसाने मृत्यू झाला आहे.

पहिली घटना बिक्रमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोटपा गावात घडली. यावेळी पावसापासून वाचण्यासाठी झाडाच्या आडोशाला असलेल्या पाचपैकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज उपविभाग परिसरात इतर ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण भाजले आहेत. यापैकी एकाला उपचारासाठी उच्च रूग्णालयामध्ये पाठवण्यात (People Death Due To Lightening In Bihar) आलं आहे. दोन जणांवर बिक्रमगंज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसामुळे (Rain) वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका तरूणाचा देखील मृत्यू झाला आहे. पहिली घटना बिक्रमगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गोटपा गावात घडली आहे. तेथे झाडाखाली असलेल्या पाचपैकी दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. अरविंद कुमार आणि ओमप्रकाश अशी मृतांची नावं आहेत. यावेळी एकजण गंभीर भाजला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

वीज पडून मृत्यू
IMD Rain Alert: मुंबई, पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

याशिवाय घोसियान कला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता बांधकामात मजूर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा विज पडून मृत्यू झाला आहे. सुनील कुमार, असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. तर सूर्यपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मठगोठणी गावात खेळणाऱ्या आकाश किशोरचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे. दिनारा पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एक अशीच घटना घडली (Unseasonal Rain) आहे. गंजभडसरा रोड कालव्यावर बेनसागर येथील विनय चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज, सूर्यपुरा आणि दिनारा पोलीस स्टेशन परिसरात या घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

वीज पडून मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain: नाशिकसह अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं; फळबागांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com