नवी दिल्ली - देशभरात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वेच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशात कडाक्याच्या थंडीबरोबर धुके पडत आहे. यामुळे रेल्वेने (Railway) 481 गाड्या रद्द केल्या आहेत, त्यामुळे जर तुम्ही कुठे जाण्याचा विचार करत असाल तर एकदा NTES वर जाऊन तुम्ही प्रवास करणारी रेल्वे सुरू आहे की रद्द करण्यात आली आहे हे एकदा नक्की तपासा. अन्यथा तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. राष्ट्रीय ऑपरेटरने 24 ट्रेनचे मूळ स्थानक देखील बदलले आहे आणि 24 इतरांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये महाराष्ट्र, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, बिहार, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. (481 trains Cancelled)
हे देखील पहा -
रेल्वेने या साईटवर माहिती दिली
कडाक्याच्या थंडीबरोबरच अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहे. तसेच थंड हवामानामुळे देशातील अनेक भागांतील गाड्यांच्या सेवेवर परिणाम होत असून त्यामुळे दररोज सुमारे 500 गाड्या रद्द होत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखत असलेल्या प्रवाशांना गाड्यांच्या प्रत्यक्ष आगमन-निर्गमनाचे तपशील मिळविण्यासाठी https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES अॅप तपासण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय वाहतूकदाराच्या मते, जर तुम्ही IRCTC द्वारे तिकीट बुक केले असेल आणि तुमची ट्रेन रेल्वेने रद्द केली असल्यास तुम्हाला ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाही कारण तिकीट आपोआप रद्द होईल आणि तुम्हाला तुमच्या पैसे मिळेल.परंतु जर तुम्ही PRS काउंटरवरून तिकीट बुक केले असेल, तर तुम्हाला PRS काउंटरला भेट देऊन आणि संबंधित फॉर्म भरून गोळा करणे आवश्यक आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.