Railway Budget 2022 : रेल्वेसाठी मोठं गिफ्ट, तीन वर्षात 400 वंदे भारत एक्स्प्रेस; अर्थमंत्र्यांची घोषणा

400 नव्या वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु करणार असून या रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या प्रवासाकरीता मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होईल
Railway budget 2022
Railway budget 2022Saam TV
Published On: 

Union Budget 2022: नवी दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharama) या केंद्रिय अर्थसंकल्प (Budget) सादर करत असताना त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या, आम्ही मागील अर्थसंकल्पामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधांवरती भर दिला होता. त्यामध्ये लसीकरणाला प्रामुख्याने महत्व दिलं होतं असं सांगत यावेळी देशात ६० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी दळणवळणावरती भर दिला असून संपुर्ण देशात दळणवळणामध्ये सुसुत्रता आणि ते कमी खर्चीक करण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचही निर्मला सितारामन यांनी सांगितलं. यावेळी एक स्टेशन एक प्रॉडक्ट लोकप्रिय करणार ज्या शहरामध्ये एखाद्या वस्तूची निर्मिती होत असेल तिथून त्यांना उद्योग करण सोप्प होईल असं धोरण आणणार असल्याचही त्या म्हणाल्या.

Railway budget 2022
Union Budget 2022 Live: यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंतचं व्हिजन - निर्मला सीतारामन

नव्या वंदे भारत रेल्वे -

शिवाय ४०० नव्या वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु करणार असून या रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या प्रवासाकरीता मॉडर्न टेक्नॉलॉजी असेल ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होईल. तसंच दळणवळणाचा खर्च कमी करण्यासाठी चार लॉजिस्टीक पार्क सुरु केले जाणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

दरम्यान विविध शहरांमध्ये मेट्रोच (Metro) जाळं उभं करणार असून यासाठी शक्य ती मदत शहरांना केली जाईल. कोणत्या शहराला मेट्रोची गरज आहे हे ओळखून त्या शहराला मेट्रो करीता सर्व सहकार्य केलं जाणारं असल्याचही त्यांनी यावेळी सांहितलं. शिवाय़ पर्वतमाला योजने अंतर्गत हिमालयचा मार्ग आहे तिकडे रस्त्यांच जाळ निर्माण केलं जाणार असल्याचही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com