भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण,नेमकं काय झालं होतं? वाचून हादरा बसेल...

२ आणि ३ डिसेंबरला झोपेत असलेले हजारो नागरिक तडफडून मारले गेले. भोपाळ वायू दुर्घटना ही जगातील सर्वात वाईट आणि सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना आहे.
भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण,नेमकं काय झालं होतं? वाचून हादरा बसेल...
भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण,नेमकं काय झालं होतं? वाचून हादरा बसेल...Saam TV
Published On

भोपाळ: जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना (Industrial Accident) ही भारतात झाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरातील हजारो नागरिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक सजीवासाठी २ आणि ३ डिसेंबरची रात्र ही काळरात्र ठरली. किटकनाशक बनवणाऱ्या एका कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती (Gas Leak) झाली आणि पाहता पाहता अख्यं शहर गुदमरलं. जे वाचले ते एकतर अपंग झाले किंवा काही महिन्यांनी मरण पावले. या रासायनिक दुर्घटनेमुळे (Bhopal Gas Tragedy) आजही या ठिकाणी शारिरीक अपंगत्व किंवा दोष असलेली बालके जन्माला येतात. दुर्घटना घडून ३७ वर्षे (37 years of bhopal gas tragedy) गेली मात्र त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. (37 years have passed since the Bhopal gas tragedy, what exactly happened? Read More...)

हे देखील पहा -

त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

मध्यप्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ येथे २ आणि ३ डिसेंबर, १९८४ या दिवशी ही दुर्घटना घडली. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टॅंकमधून अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट (एम. आय. सी.) वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. जवळपास २०,००० लोकांना या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे मृत्यू ओढवला तर ५००,००० हून जास्त जण जखमी अथवा अपंग झाले.

असा होता घटनाक्रम:

2 डिसेंबर 1984 रात्री 8 वाजता: युनियन कार्बाइड कारखान्याची नाईट शिफ्ट आली होती, तिथे पर्यवेक्षक आणि कामगार काम करत होते.

2 डिसेंबर 1984 रात्री 9 वाजता: भुयारी टाकीजवळील पाइनलाईनच्या साफसफाईच्या कामासाठी सुमारे अर्धा डझन कामगार निघून जातात.

2 डिसेंबर 1984 रात्री 10 वाजता: कारखान्याच्या भूमिगत टाकीमध्ये रासायनिक अभिक्रिया सुरू झाली, टँकरचे तापमान 200 अंशांवर पोहोचले आणि गॅस तयार होऊ लागला.

2 डिसेंबर 1984 रात्री 10:30 वाजता: टाकीतील गॅस पाईपपर्यंत पोहोचू लागला. व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद होत नसल्याने टॉवरमधून गॅस गळती होऊ लागली.

3 डिसेंबर 1984 दुपारी 12:15 वाजता: तेथे उपस्थित कर्मचारी घाबरू लागले. व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण नंतर अलार्म सायरन वाजू लागला.

3 डिसेंबर 1984 दुपारी 12:50 वाजता: आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना गुदमरणे, खोकला, डोळ्यात जळजळ, पोट फुगणे आणि उलट्या होण्याचा अनुभव येऊ लागला.

3 डिसेंबर 1984 दुपारी 1:00 वाजता: पोलिसांना खबर देण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाली. पण कारखान्याचे संचालक म्हणाले - गळती झाली नाही.

3 डिसेंबर 1984 दुपारी 2:00 वाजता: काही वेळाने रुग्णालयाच्या आवारात अशा रुग्णांची गर्दी झाली होती.

3 डिसेंबर 1984 दुपारी 2:10 वाजता: कारखान्यातून अलार्म सायरनच्या आवाजाने लोक घराबाहेर पळत होते आणि त्यांची प्रकृती खालावली होती. संपूर्ण शहरात गॅस पसरला होता.

3 डिसेंबर 1984 दुपारी 4:00 वाजता: झोपेच्या कुशीत असलेले हजारो लोक एका क्षणात विषारी वायूचे रुग्ण झाले होते. दरम्यान, गॅस गळतीवर नियंत्रण आणण्यात आले.

3 डिसेंबर 1984 सकाळी 6 वाजता: पोलिसांच्या वाहनांनी परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे इशारे देण्यास सुरुवात केली. हजारो गॅसबाधित लोक एकतर शहरातील रस्त्यावर मरत होते किंवा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते.

भोपाळ वायू दुर्घटनेला ३७ वर्ष पुर्ण,नेमकं काय झालं होतं? वाचून हादरा बसेल...
Mumbai : ओमायक्रॉनचं भान ठेऊनच.. महापरिनिर्वाण दिनी दर्शन; महापौरांच स्पष्टीकरण

असा हा भयावह औद्योगिक अपघात होता ज्यात हजारो निष्पाप भारतीय मारले गेले होते आणि आजही याचे परिणाम येथील नागरिकांमध्ये दिसून येतात. भोपाळच्या वायु दुर्घटनेवर आधारीत चित्रपट 'भोपाल एक्सप्रेस' (Bhopal Express) १९९९ मध्ये आला होता. महेश मथाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या हिंदी चित्रपटात नसीरुद्दीन शाह, के.के. मेनन आणि नेत्रा रघुनाथन यांनी भुमिका साकारली आहेत. याशिवाय यशराज फिल्म्स (YRF) ने त्याच्या डिजिटल बॅनरखाली आपला पहिला मोठा OTT प्रकल्प द रेल्वे मॅन (The Railway Men) जाहीर केला. या वेब सिरीजमध्ये (Web Series) आर माधवन, के. के. मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका असेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com