चर्चमध्ये अन्न-भेटवस्तूंचे वाटप, गर्दी उसळल्याने गेट तुटून चेंगराचेंगरी; ३१ जणांचा मृत्यू

नायजेरियात चर्चमध्ये अन्न आणि भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली.
Nigeria Stampede in overcrowded Church charity Latest Update in Marathi (ANI)
Nigeria Stampede in overcrowded Church charity Latest Update in Marathi (ANI)SAAM TV
Published On

लागोस: नायजेरियात (Nigeria) शनिवारी दुर्दैवी घटना घडली. एका चर्चमध्ये अन्न आणि भेटवस्तूंच्या वाटप सुरू असताना, प्रचंड गर्दी उसळून गेट तुटला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत (Nigeria Stampede) जवळपास ३१ जणांचा मृत्यू झाला. चर्चकडून शॉप फॉर फ्री हा चॅरिटी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अन्न आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येत होते, अशी माहिती मिळते. या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दीच्या रेट्यामुळं गेट तुटून चेंगराचेंगरी झाली. यात ३१ जण मृत्युमुखी पडले. यात लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. (31 people killed in stampede in southern Nigeria during overcrowded church charity event)

Nigeria Stampede in overcrowded Church charity Latest Update in Marathi (ANI)
Jalgaon: यात्रेत चेंगराचेंगरी; बारागाड्यांखाली येऊन एकाचा मृत्‍यू

सीएनएन या वृत्तसंस्थेने पोलीस (Police) आणि सुरक्षा (Security) अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. दक्षिण-पूर्व नायजेरियातील पोर्ट हरकोर्ट या शहरात शनिवारी एका चर्चमध्ये अन्न आणि भेटवस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमावेळी गोंधळ उडाला. गर्दीच्या रेट्यामुळे चर्चचा गेट तुटला. त्यानंतर चेंगराचेंगरी (Stampede) झाली. या दुर्घटनेत किमान ३१ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अन्य सात जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे.

Nigeria Stampede in overcrowded Church charity Latest Update in Marathi (ANI)
Vaishno Devi Stampede : कटरा - वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; पाहा व्हिडीओ

चर्चमध्ये शनिवारी सकाळीच जेवणासाठी शेकडो लोक पोहोचले होते. चर्चचा गेट तुटल्याने चेंगराचेंगरी झाली. नायजेरियाच्या नागरी सुरक्षा विभागाचे प्रवक्ता ओलुफेमी अयोडेल यांच्या माहितीनुसार, किंग्ज असेंबली चर्चकडून शॉप फॉर फ्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांना अन्न आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात येत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. पोलिसांचे प्रवक्ता ग्रेस वोयेन्गिकुरो इरिंगे-कोको यांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने सांगितले की, चर्चचे गेट बंद असूनही नागरिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. गेट तुटल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरू होणार होता. मात्र, रांगेत उभे राहण्यासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासूनच गर्दी केली होती. घटनास्थळाचा व्हिडिओही समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com